साप्ताहिक राशिभविष्य (२९ ऑगस्ट २०२१ ते ४ सप्टेंबर २०२१)

माणूस एक स्थळ आहे, आणि या स्थळात एक स्वर गुणगुणत असतो. अर्थातच हा एक ह्रदयातला स्वर असतो आणि हा ह्रदयातला स्वर एक ताल पकडत असतो म्हणा.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

गीत गोविंदाचा स्वर पकडू या!

माणूस एक स्थळ आहे, आणि या स्थळात एक स्वर गुणगुणत असतो. अर्थातच हा एक ह्रदयातला स्वर असतो आणि हा ह्रदयातला स्वर एक ताल पकडत असतो म्हणा, किंवा सूर पकडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणा, आणि हा सूर म्हणजेच माणसाचे जीवन होय !

माणूस हा एक महदाकाशातील प्रणवाचा एक प्रतिध्वनी आहे. आणि या प्रतिध्वनीला माणूस नामरुपाचे वस्त्र वेटाळून आपल्या आलापाविलापातून आपल्या जीवन संगीताची रागयुक्त वाटचाल करत असतो. जीवनाला संगीताची उपमा देणारी आपली संस्कृती जीवनाला एक स्वरसाधनाच समजते !

माणसाच्या पत्रिकेतील ग्रह हा एक वाद्यवृंदच आहे. या वाद्यवृंदाची उत्तम साथसंगत मिळाली की माणसाचे जीवन एका सूरात चालते. आमच्या दृष्टीने माणसाच्या पत्रिकेतील मंगळ हा एक तबला आहे. हर्षल हा एक त्याचा ताल आहे. नेपच्यून हा एक स्वर आहे आणि प्लूटो हा या स्वराची लय आहे. माणसाने आपल्या ह्रदयातील मूळ स्वराशी संधान ठेवून राह्यलं की, मनाला त्या स्वराची गोडी लागते. आणि मग त्या एक प्रकारच्या लयीत ते आपले ह्रदयगीत ऐकू लागते. अर्थातच त्या गीत गोविंदाच्या बासरीचे स्वर आपल्या इंद्रियरूपी गोपगोपींबरोबर आळवू लागते!

मित्रहो, सप्ताहात होणाऱ्या विचित्र अशा ग्रहयोगांतून, मंगळाच्या तबल्याचा ताल जीवनसंगीताला लाभणार नाही. तरी आपण उद्याच्या सोमवारच्या श्रीकृष्ण जयंतीच्या अष्टमीच्या मुहूर्त साधत आपल्या ह्रदयातील गीत गोविंदाचे स्वर पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करू या.

गाठीभेटी फलदायी ठरतील

मेष : सप्ताहात मंगळ- नेपच्युन ग्रहयोगाची पार्श्‍वभूमी आणि राशीचा हर्षल ! कोणताही अतिरेक अंगाशी आणणारा. ता. ३१ चा मंगळवार कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी घातक. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ व २ हे दिवस गाठीभेटीतून फलदायी होतील मुलाखतीतून यश. ता. ४ चा शनिवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी एक बॅड डे.

स्वतंत्र व्यावसायिकांना मोठा धनलाभ

वृषभ : मंगळ नेपच्यून योगातून सहवासातील माणसाची दहशत राहील. नवपरिणितींना त्रास. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी जपावं. मात्र शुक्रभ्रमणाची विशिष्ट स्थिती ता. २ व ३ या दिवसांत मोठी बहारदार फळं देईल व स्वतंत्र व्यावसायिकांचे मोठे धनलाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार स्त्रीहट्टाचा.

प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील

मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रभ्रमणाची नक्षत्रगत स्थिती अफलातून बोलेल ता. १ व २ हे दिवस घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय करतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार मोठा सुवार्तांचा नोकरीत प्रशंसा, मात्र शनिवार एकूणच आपल्या राशीस विरोधाचा. शेजारीपाजारी मोठा उपद्रव देतील.

कलाकारांना उत्तम कालखंड

कर्क : सप्ताहात नैसर्गिक साथ मिळणार नाही, उत्सव समारंभात बेरंग होऊ शकतात. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रसंगाचे भान ठेवावं बाकी शुक्रभ्रमणाची स्थिती कलाकारांना उत्तमच. छान गोपालकाला साजरा कराल, शुक्रवारी मोठा मानसन्मान होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी हरवा हरवी होण्यापासून जपावे.

नोकरीत पगारवाढ होईल

सिंह : मंगळ नेपच्यून योगाचं हायव्होल्टेज राहील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळावे बाकी बुध शुक्राची स्थिती ता. २ व ३ या दिवसांत नोकरीत पगारवाढ घडवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ चा बुधवार सूर्योदयी मोठ्या व्यक्तीगत सुवार्ता मिळवून देईल. शनिवार सभोवताली कलहजन्य वातावरण ठेवेल. नवपरिणीतांनी संयम ठेवावा.

नोकरीत प्रशंसा होईल, प्रभाव वाढेल

कन्या : सप्ताहात भाजण्याकापण्यापासून जपाच. बाकी शुक्रभ्रमणाची स्थिती ता. १ व २ या दिवसात निर्णायक शुभ बोलेल. नोकरीतील वर्चस्व वाढेल. मोठी प्रशंसा होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती सेलिब्रिटी बनतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती खरा गोपालकाला साजरा करतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठ्या सुवार्तांचा.

जल्लोष व मौजमजेचा कालखंड

तूळ : मंगळ नेपच्यून योगाचे हाय व्होल्टेज स्त्रीपुरुष संबंधातून जाणवू शकते. विशाखा व्यक्तींना ता. ३१ व ता. ४ हे दिवस सहवासातून ठिणग्या उडवणारे. बाकी चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ चा दिवस मोठ्या मौजमजेचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार वैयक्तिक जल्लोषाचा.

नोकरीत वरिष्ठांना सांभाळा, वाद टाळा

वृश्‍चिक : सप्ताह थोडा परस्परविरोधी ग्रहमानाचा. वादग्रस्त मुद्दे टाळा. नोकरीत वरिष्ठांना सांभाळा. बाकी शुक्रभ्रमणाच्या विशिष्ट परिस्थीतीचा ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती लाभ उठवतील. वैवाहिक जीवनातील सुवार्ता प्रसन्न करतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या लाभातून गोपाळकाला साजरा करतील.

परदेशात भाग्योदय

धनु : सप्ताहात सुवार्तांतून फ्लॅशन्यजमध्ये येणारी रास राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ व २ हे दिवस विशिष्ट कामात मोठे यश देणारे. तरुणांचे परदेशी भाग्योदय. परिचययोत्तर विवाहयोग. व्यावसायिकांची मंत्रालयातील कामे होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पगारवाढ, सप्ताहात धावपळीचा प्रवास टाळा.

हुकमी यश मिळेल

मकर : सप्ताह थोडा अवघड वळणाचा. ओव्हरटेकींग टाळाच. बाकी शुक्रभ्रमणाची एक फेज व्यावसायिकांना उत्तम गारवा देईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व ३१ हे दिवस एखादे हुकमी यश देतील. कलाकारांचे भाग्योदय. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार चोरीपासून जपा.

धनाची चिंता दूर होईल

कुंभ : मंगळ नेपच्यून योगाचे हायव्होल्टेज सप्ताहावर अंमल करेल. एखादी मानवी दहशत छायाग्रस्त करेल. नोकरीत सांभाळा. बाकी ता. ३० व ३१ हे दिवस पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना धनचिंता घालवतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १ सप्टेंबरचा बुधवार घरात जल्लोषाचा, शनिवारी बाचाबाची होणे शक्य.

सरकारी कामांमध्ये मोठे यश लाभेल

मीन : शुक्रभ्रमणाची नक्षत्रग्रस्त स्थिती मोठी अफलातून फळे देईल. मात्र सप्ताहात विद्युत उपकरणापासून जपा. प्रवासात काळजी घ्या. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात सरकारी कामांतून मोठे यश ता. ३१ व १ हे दिवस घरात सुवार्तांचे. रेवती नक्षत्राच्या पती वा पत्नीचा भाग्योदय चकित करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com