अध्यक्षपदासाठी NCP सहकार पॅनेलची आज महत्वपूर्ण बैठक

Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Summary

बँक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळविलं आहे.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) सहकार पॅनेलच्या संचालकांची आज (रविवारी) सायंकाळी सात वाजता बैठक होत आहे. या बैठकीत अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांविषयी चर्चा होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नेत्यांच्या गाठीभेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून अध्यक्षपदासाठीचे नाव निश्चित करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सोमवारीच बारामतीतून संदेश आल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) नाव जाहीर करतील. त्यामुळे शरद पवार कोणाचे नाव निश्चित करणार याची उत्सुकता आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. सध्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतील संचालकालाच संधी मिळावी, असा सूर कार्यकर्त्यांतून येत आहे. त्यामुळे संचालक नितीन पाटील यांनी अध्यक्ष होण्यासाठीची सर्व तयारी केली आहे, तर दुसरीकडे महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र राजपुरे यांना, तर पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर यांना अध्यक्षपदावर संधी मिळावी, अशी लेखी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नितीन पाटलांसह राजेंद्र राजपुरे, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे आघाडीवर आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांची गेल्या दोन दिवसांत भेट घेऊन दुसऱ्यांदा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी अध्यक्षपदाचा निर्णय आता पवारांच्या कोर्टात टाकला आहे.

Sharad Pawar
औंध सोसायटीत 13 जागांसाठी 26 उमेदवार आमनेसामने

चार ते पाच दिवसांपूर्वी सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील हे खासदार शरद पवार यांना सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटले होते. त्या वेळी त्यांनी अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले व नितीन पाटील दोघे इच्छुक असल्याचे सांगितले होते. या वेळी श्री. पवार यांनी दोघांचीही जिल्हा बॅंकेतील कारकिर्दीची माहिती घेतली. त्या वेळी सभापती रामराजे निंबाळकर यांनी खासदार पवार यांना तुम्हीच अध्यक्षपदाचा उमेदवार सूचवा, अशी विनंती केली आहे. त्यानुसार खासदार शरद पवार उद्या (रविवारी) अजित पवार यांच्याशी चर्चा करून अध्यक्षपदाचे नाव निश्चित करणार आहेत. हे नाव सोमवारी ते जाहीर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) जिल्हा बॅंकेच्या सहकार पॅनेलच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक सायंकाळी सात वाजता जिल्हा बॅंकेत होणार आहे. यामध्ये अध्यक्षपदासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

Sharad Pawar
'भाजपकडून मला आमदारकीसाठी तिकीट देण्याची ऑफर'

पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी बैठक

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (ता. ६) सकाळी साडेअकरा वाजता संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची नावे सर्वानुमते जाहीर केले जाणार आहेत. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com