प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणार; रामराजेंची मोठी घोषणा

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणार; रामराजेंची मोठी घोषणा
Summary

माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

सातारा: सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण जाधव या खेळाडूने टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पर्यंत मजल मारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आगामी काळामध्ये होणाऱ्या ऑलम्पिक व इतर खेळासाठी प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणार; रामराजेंची मोठी घोषणा
'प्रवीणच्या कुटुंबीयांना सातारा सोडण्याची वेळ येवू देणार नाही'

फलटण येथील विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या " लक्ष्मी - विलास पॅलेस " या निवासस्थानी प्रवीण जाधव यांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. त्या वेळी रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विकास भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणार; रामराजेंची मोठी घोषणा
ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार

फलटण तालुका व सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जाहिर सत्कार करण्याचे नियोजन करणार आहे. फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी प्रवीण जाधव यांचा सत्कार व सन्मान आगामी काळामध्ये करण्यात येणार आहे. फलटण तालुक्यामध्ये मुले व मुलींचे हॉकी, कबड्डी या खेळांसह विविध खेळांमध्ये उत्कृष्ठ प्रशिक्षण मिळण्यासाठी फलटण येथे प्रशिक्षण केंद्र व उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देणार आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणार; रामराजेंची मोठी घोषणा
..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

फलटण सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आगामी काळामध्ये उत्तोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी आपण या पुढे कार्यरत राहणार आहोत. फलटण तालुक्यातील सरडे सारख्या गावातून प्रवीण जाधव ह्याने आर्चरी ह्या खेळामध्ये शिक्षण घेतले व टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक मधील पदकापर्यंत मजल मारली, त्या बद्दल फलटण तालुक्यातील सर्व जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे, असेही या वेळी रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणार; रामराजेंची मोठी घोषणा
Rain Alert : पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा

फलटण तालुक्यातील सरडे येथील प्रवीण जाधव याने टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये आर्चरी हा खेळ खेळून मेडल पर्यंत मजल मारली. प्रवीण जाधव यांची पहिली वेळ असल्याने त्यांना या वेळी अपयश आले. पुढच्या होणाऱ्या ऑलम्पिक साठी प्रवीण जाधव यांना आंतरराष्टीय दर्जाचे ट्रेनिंग देवून प्रवीण हे पुढच्या ऑलम्पिक मध्ये पदक मिळवतील, ही खात्री आपल्या सगळ्यांना आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com