सातारा : हद्दपार दोन गुंडांना अटक

एलसीबी पथकाची कारवाई; कऱ्हाडात फिरताना पकडले
दोन अट्टल ‘बॅग लिफ्टर’ला अटक
दोन अट्टल ‘बॅग लिफ्टर’ला अटकsakal

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेल्या गुंडांना काल रात्री एलसीबीच्या पथकाने येथील बस स्थानक परिसरातून अटक केली. प्रतीक साठे (वय २८) व बजरंग ऊर्फ बज्या माने (२७, रा. दोघे रा. बुधवार पेठ) अशी दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, की पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी पोलिस रेकॉर्डवरील संशयितासह काही गुंडांना हद्दपार केले आहे. त्यातील साठे, माने यांना पोलिसांनी १९ एप्रिलला सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यांतील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिन्यांकरिता हद्दपार केले आहे. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे. मात्र, त्या आदेशाचा भंग करून दोघेही जिल्ह्यात वास्तव्यास आल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनखाली त्या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी येथील बस स्थानक परिसरात काल रात्री सापळा रचला. त्यात दोन्ही गुंड अडकले.

साठे, माने त्या परिसरात वावरताना सापडले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडे हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षकांची जिल्ह्यात येण्याची परवानगी आहे काय, याची चौकशी त्यांच्याकडे केली. मात्र, त्यांच्याकडे तशी कोणतीही परवानगी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन्ही संशयितांना रात्री दहाच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलिसांत नोंद झाला आहे. हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, मुनीर मुल्ला, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, प्रवीण पवार, केतन शिंदे, गणेश कचरे यांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com