PM आवासमध्ये 'ZP'चा डंका; राज्य पुरस्कृत योजनेत द्वितीय क्रमांक

Pradhanmantri Awas Yojana
Pradhanmantri Awas Yojanaesakal

सातारा : पुणे विभागात (Pune Division) महाआवास अभियानात (Mahaawas Abhiyan) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhanmantri Awas Yojana 2021) ग्रामीण भागात सातारा जिल्हा परिषदेने (Satara Zilla Parishad) तृतीय, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत द्वितीय क्रमांक पटकाविला असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे.

Summary

विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण सोमवार (ता. ३०) दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्तांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.

विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण सोमवार (ता. ३०) दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्तांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीच्या बैठकीत पुरस्कार जाहीर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये पाटण तालुक्याने द्वितीय, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत तृतीय क्रमांक पटकाविला.

Pradhanmantri Awas Yojana
गेल ऑम्वेट यांची 35 हून अधिक पुस्तकं पुरोगामी चळवळीला ताकद देणारी!

शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना एकत्रितमध्ये पाटण तालुक्याने द्वितीय क्रमांक पटकाविल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी दिली. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प संचालक अविनाश फडतरे उपस्थित राहणार आहेत.

Pradhanmantri Awas Yojana
मराठ्यांना 'ओबीसी'तूनच आरक्षण द्या, अन्यथा राज्यभर आंदोलनं

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात यश आल्याने शासनाने जिल्हा परिषदेचा गौरव केल्याचा आनंद आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात होत आहे. ग्रामीण भागामध्ये कोणतेही कुटुंब घरापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे.

-विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com