भाजप आमदाराच्या रुग्णालयाची होणार झाडाझडती; उलट-सुलट चर्चांना उधाण

मायणीत उद्या त्रिसदस्यीय समिती
Jaykumar Gore
Jaykumar Goreesakal

मायणी (सातारा) : अनेक तक्रारींच्या फेऱ्यात अडकलेल्या आमदार गोरेंच्या (MLA Jaykumar Gore) संबंधित इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर (Institute of Medical Sciences and Research Center Mayani) या मेडिकल कॉलेज (Medical College) संलग्नित रुग्णालयाची झाडाझडती करण्यासाठी उद्या त्रिसदस्यीय विशेष पथक येथे दाखल होणार आहे. त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Summary

रुग्णालयाच्या चौकशीसाठी पथक येणार असल्याचे वृत्त मायणीसह परिसरात पसरले आणि विविध चर्चेला उधाण आले आहे.

त्याबाबतची माहिती अशी : मेडिकल कॉलेजशी संलग्नित रुग्णालयात चालविण्यात आलेल्या कोविड सेंटर (डीसीएचसी) मधील उपचार व बिलांबाबत रुग्णांच्या नातेवाईकांसह नागरिक व काही सामाजिक संस्थांनी कलेक्टर, आरोग्यमंत्री आदींकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी काही लेखी तक्रारींची आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मंगळवार (ता. १७ ) रोजी त्रिसदस्यीय समिती मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. पुणे मंडलाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजीव कदम यांचे तसे लेखी पत्र येथील रुग्णालय व्यवस्थापनाला प्राप्त झाले आहे.

Jaykumar Gore
डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार का सापडत नाही?

त्या पत्रातील मजकूर असा : इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर मायणी (ता. खटाव, जि. सातारा) हे रुग्णालय २३ एप्रिल २०२० रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत करण्यात आले आहे. जुलै २०२१ मध्ये टी.पी.ए. (थर्ड पार्टी अडमिनिस्ट्रेटर) मार्फत केलेल्या चौकशीमध्ये एबीजी रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तीन ऑगस्ट २०२१ पासून जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत समन्वय व शिस्तपालन समिती मार्फत रुग्णालय निलंबित करण्यात आले. रुग्णालयाच्या पुढील दाव्यांची अदायगी स्थगीत करण्यात आली. आता विशेष पथका मार्फत रुग्णालयाची इतंभुत चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Jaykumar Gore
राजकारण्यांना कामाला लावण्याचं काम 'पाणी फाउंडेशन'चं : आमदार गोरे

चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे आहेत. तर सहाय्यक संचालक ( वैद्यकीय ) उपसंचालक कार्यालय, पुणे आणि डॉ. अमोल मस्के विभागीय व्यवस्थापक, पुणे (सदस्य सचिव ) असे दोन सदस्य आहेत. दरम्यान, रुग्णालयाच्या चौकशीसाठी पथक येणार असल्याचे वृत्त मायणीसह परिसरात पसरले आणि विविध चर्चेला उधाण आले आहे. येणारी समिती काय-काय तपासणार, कोणकोणते गैरव्यवहार घोटाळे बाहेर काढणार, काय कारवाई करणार, आम्हाला न्याय मिळणार का?, असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com