भारतात आढळले 1.6 अब्ज वर्ष जुने जीवाश्म

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मध्य भारतातील चित्रकुट येथील फॉस्फेटसमृद्ध गाळाच्या खडकांमध्ये 1.6 अब्ज वर्ष जुने जीवाश्म सापडल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.

1.6 अब्ज वर्षांपूर्वीचे हे जीवाश्म सर्वात जुने असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. आतापर्यंत कॅनेडियन आर्क्टिकमध्ये सापडलेले रेड अल्गी हे 1.2 अब्ज वर्षे जुने जीवाश्म जगातील सर्वात जुने असल्याची नोंद होती.

शास्त्रज्ञांनी मंगळवारी रेड अल्गी सारख्या भासणाऱ्या सुक्ष्म आकाराच्या या जीवाश्माची माहीती दिली. त्यांचे वास्तव्य समुद्राच्या उथळ भागात असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन जीवाश्मात पेशींची रचना आणि आकार रेड अल्गीशी मिळताजुळता असल्याचे तसेच इतर जीवाश्मांमध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी आढळणारी रचना यातही असल्याचे त्यांनी सांगितले. 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर सागरी जीवाणुंच्या स्वरुपात 3.7 ते 4.2 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वप्रथम जीवन आढळून आले होते. त्यानंतर वनस्पती आणि प्राणी जीवनाची सुरुवात पृथ्वीवर झाली, असे संशोधकांचे मत आहे. 

टॅग्स