पेट्रोलशिवाय चालणाऱ्या या ५ कार सध्या ठरतायत लोकप्रिय

या कार्समध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासाबरोबरच अनेक आधुनिक फीचर्स कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. या गाड्या अतिशय आरामदायी असतील.
EV
EVgoogle

मुंबई : जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण असाल आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू इच्छित असाल, तर आज या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या काही बेस्ट बजेट इलेक्ट्रिक कारची माहिती देणार आहोत. या कार्समध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासाबरोबरच अनेक आधुनिक फीचर्स कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. या गाड्या अतिशय आरामदायी असतील.

Tata Tigor EV

Tata Tigor EV ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ही कार १२.४९ लाख रुपयांच्या किंमतीसह बाजारात आणली आहे. कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये २६ kWh बॅटरी पॅक प्रदान करते.

एकदा हा बॅटरी पॅक पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार ३०६ किमीपर्यंत चालवता येते. ही कार ७४ bhp ची कमाल पॉवर तसेच १७० Nm पिकअप टॉर्क बनवू शकते. या कारमधील बॅटरी पॅक १५-amp वॉल अॅडॉप्टर चार्जरच्या मदतीने साडेआठ तासांत ८० टक्के चार्ज होऊ शकतो. त्याच वेळी, DC फास्ट चार्जरसह, ते केवळ एका तासात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकते.

Tata Nexon EV

Tata Nexon EV ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ही कार ₹ १४.७९ लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च केली आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी ₹ १७.४० लाखांपर्यंत जाते. कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये ३०.०२ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक प्रदान करते.

एकदा का हा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज झाला की, ही कार ३१२ किमीपर्यंत चालवता येते. या कारच्या पुढील भागात परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर बसवण्यात आली आहे. ही मोटर २४५ Nm पिकअप टॉर्कसह १२९ PS कमाल पॉवर बनवू शकते.

Tata Nexon EV Max

Tata Nexon EV Max ही कंपनीच्या Tata Tigor EV कारची अद्ययावत आवृत्ती आहे. कंपनीने ही कार ₹ १७.७४ लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च केली आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी ₹ १९.२४ लाखांपर्यंत जाते. या कारला पूर्वीपेक्षा अधिक रेंज आणि चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या या नवीन कारमध्ये ४०० किलोमीटरहून अधिकची रेंज मिळते.

MG ZS EV

कंपनीने MG ZS EV चे दोन प्रकार बाजारात लॉन्च केले आहेत. याच्या Excite प्रकाराची किंमत ₹ २२ लाख आहे आणि Exclusive variant ची किंमत ₹ २५.८८ लाख कंपनीने निश्चित केली आहे. नवीन MG ZS EV मध्ये, कंपनी ५०.३ kWh चा मोठा बॅटरी पॅक ऑफर करते.

एकदा हा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, ही कार ४६१ किमी पर्यंत चालवता येते. ही इलेक्ट्रिक कार ८.५ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे.

Hyundai Kona

Hyundai Kona ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक कार आहे, जी कंपनीने ₹ २४.०२ लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात आणली आहे. कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये ३९.२ kWh बॅटरी पॅक प्रदान करते.

एकदा हा बॅटरी पॅक पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार ४५२ किमीपर्यंत चालवता येते. यात एक शक्तिशाली मोटर आहे जी १३४ Nm च्या पिकअप टॉर्कसह ३९५ bhp ची कमाल पॉवर बनवू शकते. या कारमधील बॅटरी पॅक सामान्य चार्जरच्या मदतीने ११ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. त्याच वेळी, फास्ट चार्जरसह, ते केवळ एका तासात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com