इंटरनेट वापरताना 63 टक्के चिंतातुर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई : "मायक्रोसॉफ्ट'ने डिजिटल सभ्यतेच्या निर्देशांकाच्या निमित्ताने नुकतेच 14 देशांत सर्वेक्षण केले. "सुरक्षित इंटरनेट दिना'च्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष काढण्यात आले. भारतातील सर्वेक्षणात 63 टक्के लोकांना ऑनलाईनमध्ये धोका असल्याचे वाटते, असे दिसून आले. 

44 टक्के भारतीयांना काही महिन्यांत ऑनलाईन जोखमीला सामोरे जावे लागले. तरुण-तरुणी अधिक हुशारीने इंटरनेटचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. एखाद्या घटनेनंतर इंटरनेटवरून मदत कशी व कुठे मिळवायची, हे 50 टक्के तरुणांना माहीत आहे. प्रौढांमध्ये हे प्रमाण 35 टक्के आहे. इंटरनेट वापरताना फसवणुकीचा धोका वाटणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 64 टक्के आणि स्त्रियांचे प्रमाण 61 टक्के आहे. महिलांकडून अधिक प्रभावीपणे प्रायव्हसी कंट्रोलचा पर्याय वापरला जातो. इंटरनेट वापरणाऱ्यांची वागणूक आणि संभाषणाचा अभ्यास करणे हा ऑनलाईन सर्वेक्षणाचा उद्देश होता. सर्वेक्षणात 13 ते 17 वयोगटातील मुले आणि 18 ते 74 वयोगटातील लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले.