'ऍपल' परिषदेसाठी भारतीय वंशाच्या अन्विताची निवड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 जून 2016

न्यूयॉर्क - बालप्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी "ऍपल‘ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऍप डेव्हलपर्सच्या परिषदेसाठी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या अन्विता विजय या नऊ वर्षाच्या बालिकेची निवड झाली आहे.

न्यूयॉर्क - बालप्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी "ऍपल‘ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऍप डेव्हलपर्सच्या परिषदेसाठी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या अन्विता विजय या नऊ वर्षाच्या बालिकेची निवड झाली आहे.

सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या ऍप परिषदेला उपस्थित राहणारी अन्विता ही सर्वांत लहान वयाची ऍप डेव्हलपर आहे. या परिषदेत अन्विता वर्षभर युट्युब आणि इंटरनेटवर "फ्री कोडिंग ट्युटोरियल्स‘चा अभ्यास करत होती. तिने आपल्या नुकतेच रांगायला सुरूवात केलेल्या बहिणीसाठी ऍप विकसित केले आहे. लहान मुलांना बोलायचे कसे, प्राणी कसे ओळखायचे याबाबत हे ऍप मार्गदर्शन करणार आहे. आयफोनसाठी विकसित केलेल्या या ऍपद्वारे रंगांची ओळख कशी करतात हे ही लहान मुलांना शिकविण्यात येणार आहे. जागतिक डेव्हलपर परिषदेचा एक भाग म्हणून अन्विताला "ऍपल‘ची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत डेव्हलपरला "ऍपल‘च्या विविध डिव्हाईसेससाठी ऍप विकसित करण्याची संधी प्राप्त होते. या परिषदेत आतापर्यंत अशियायी पुरुषांचे वर्चस्व होते. मात्र कंपनी आणि संयोजकांनी जाणीवपूर्वक हे वर्चस्व कमी करण्यासाठी अफ्रिकन-अमेरिकन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही यांतून संधी दिली आहे.

अन्विताने कसे डेव्हलप केले ऍप?
सुरुवातीला अन्विताने ऍपची तयार करण्याची कल्पना केली. त्यानंतर त्यासाठी आवश्‍यक त्या तांत्रिक बाबींचा इंटरनेट आणि युट्युबटच्या माध्यमातून अभ्यास केला. ऍप विकसित करताना प्रोटो टाइप डिझायनिंग, वायरफ्रेमिंग, इंटरफेस डिझाईन, कोडिंग, टेस्टिंग आदी प्रक्रिया अन्विता खूप परिश्रम घेतले. परिणामी तिचे स्वप्न साकार झाले आणि तिला परिषदेत संधी मिळाली. परिषदेदरम्यान तिला ऍपचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना भेटण्याची इच्छा असल्याचे तिने एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. यापूर्वीही अन्विताने आयफोन आणि आयपॅडसाठी काही ऍप विकसित केल्या आहेत.

तुम्ही कसे करता मुलांना प्रोत्साहित?
भारतात लहान मुलांच्या हाती इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌स देताना ते त्याचा कसा वापर करतात यावर अनेक चर्चासत्रे आयोजित केले जातात. अशा चर्चासत्रातील निष्कर्षांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. भारतात लहान मुलांना गॅजेट्‌स हाताळायला देताना त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. त्यासाठी आवश्‍यक ते स्रोत पालकांनी उपलब्ध करून द्यायला हवेत. सकारात्मक वापर आणि काही तांत्रिक गोष्टी शिकवल्या तर ही मुले नवे आविष्कार घडवू शकतात. या सर्व पार्श्‍वभूमीवर तुमचे अनुभव शेअर करा. तुम्ही मुलांना इलेक्‍ट्रॉनिक गॅजेटस्‌ वापरायला देता का? ते त्याचा कसा वापर करतात? तुम्हाला त्यांनी त्याचा कसा वापर करणे अपेक्षित आहे? त्यासाठी तुम्ही काय करता? व्यक्त व्हा...

Web Title: 9-yr-old Indian-origin girl is the youngest at Apple WWDC 2016

फोटो गॅलरी