घरकाम करणाऱ्या वडिलांच्या मुली महत्त्वाकांक्षी! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

आपल्या मुलाने कर्तृत्ववान असावे असे सर्वच पालकांना वाटते. वडील घरकामात मदत करीत असल्यास मुली अधिक महत्त्वाकांक्षी होतात, असे "युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया'ने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांनी सात ते 13 वयोगटातील 326 मुली आणि त्यांच्या प्रत्येकी एका पालकावर हा प्रयोग केला.

""वडिलांच्या घरकामाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा मुलीच्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षेशी थेट संबंध असल्याचे यातून स्पष्ट झाले. घरात फक्त आईच काम करीत असल्यास मुली वेगळे करिअर निवडण्यापेक्षा परिचारिका, शिक्षिकेसारखे पारंपरिक व्यवसाय निवडतात.

ज्या कुटुंबात पालकांकडून जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात, त्या घरातील मुली चौकटीबाहेरील करिअर घडवत असल्याचे सूचित होते,'' असे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील संशोधक अलिसा क्रॉफ्ट यांनी सांगितले.