अंटार्क्‍टिकापासून हिमनग दूर होताहेत... 

Antarctika berg are getting away from the ...
Antarctika berg are getting away from the ...

न्यूयॉर्क :  आतापर्यंत नोंद झालेल्या सर्वांत मोठ्या हिमनगांपैकी एक असलेला हिमनग अंटार्क्‍टिका खंडापासून तुटून दूर होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हा हिमनगाचा आकार कॅरेबियन बेट समूहातील त्रिनिदाद आणि टोबॅगो या बेटांच्या एकत्रित आकाराइतका आहे. 
अंटार्क्‍टिकाच्या किनाऱ्यापट्टीवरील लार्सन सी भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली दरी वाढत असून, गेल्या महिन्यात त्याची लांबी अचानक 18 किमीने वाढली. या दरीची लांबी आता जवळपास 80 किमी झाली असून, अजून केवळ वीस किमी वाढ झाल्यानंतर हा हिमनग मुख्य भूमीपासून दूर होईल. हा हिमनग दूर झाल्यास लार्सन सी भागाचा आकार पाच हजार चौरस किमीहून अधिक कमी होणार आहे. तसेच हिमनग बाजूला झाल्याने या खंडाचा आकार बदलणार असून, लार्सन सी भागात आणखी दऱ्या निर्माण होण्याची भीतीही असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 

काय परिणाम होईल? 
लार्सन सी हा भाग अंटार्क्‍टिका खंडावरील हिमनद्यांच्या पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाचा थर आहे. या थराची जाडी काहीशे मीटर असते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, असे बर्फाचे थर मुख्य भूमीपासून तुटत राहिले, तर तापमानवाढीमुळे वेगाने वाहणाऱ्या हिमनद्या अधिक वेगाने समुद्राच्या पाण्यात मिसळतील आणि त्यामुळे समुद्र पातळीमध्ये वाढ होईल. गेल्या काही वर्षांत अंटार्क्‍टिकाच्या उत्तर भागात असे काही थर तुटून वेगळे झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com