कॅन्सरवरील औषध लोकांसाठी उपलब्ध

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

सिडनी : कॅन्सरच्या पेशींना विरघळून टाकणारे औषध आजपासून ऑस्ट्रेलियातील लोकांना उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑगस्ट 2016 मध्ये अमेरिकेत या औषधाला परवानगी मिळाल्यानंतर या औषधाचा वापर लोकांसाठी सुरू झाला होता.

सिडनी : कॅन्सरच्या पेशींना विरघळून टाकणारे औषध आजपासून ऑस्ट्रेलियातील लोकांना उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑगस्ट 2016 मध्ये अमेरिकेत या औषधाला परवानगी मिळाल्यानंतर या औषधाचा वापर लोकांसाठी सुरू झाला होता.

मेलबर्नमध्ये व्हेनेटोक्‍लॅक्‍सतर्फे या औषधाची निर्मिती करण्यात आली असून, "व्हेनक्‍लेक्‍स्टा' या नावाने त्याची विक्री केली जात आहे. ज्या रुग्णांना कॅन्सरच्या अन्य औषधोपचारांचा उपयोग होत नाही, अशांसाठी हे औषध वापरले जाते. थेराप्युटिक गुड्‌स ऍडमिनिस्ट्रेशनने (टीजीए) हे औषध लोकांना वापरण्यास परवानगी दिली आहे. गेल्या 30 वर्षांपासून या औषधाचा शोध सुरू होता. आता हे औषध सापडल्यानंतर ते लोकांना उपलब्ध होणे ही सर्वांत महत्त्वाची बाब होती, असे मत अध्यक्ष डॉग हिल्टन यांनी व्यक्त केले.

असे करते काम
बीसीएल-2 प्रोटिनमुळे कॅन्सरच्या पेशी जिवंत राहतात. "व्हेनक्‍लेक्‍स्टा' हे थेट बीसीएस-2 वरच आघात करत असल्याने त्याची ताकद कमी होते व या पेशी मृत पावतात. बीसीएल-2 प्रोटिनसाठी हे औषध म्हणजे एक प्राणघातक बाणच असल्याचे मत डॉग यांनी व्यक्त केले आहे.

साय-टेक

मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. ईओलिस दोर्सा नामकरण केलेल्या मंगळावरील भागात पाण्याचे साठे...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

गेल्या आठवड्यात अॅपलने नव्या मोबाईल फोनची घोषणा केली आणि आयफोन 8 ची चर्चा सुरू झाली. 'आयफोन' मुळात इतर मोबाईल फोनपेक्षा महागडा;...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

क्युपर्टिनो : अॅपल कंपनीने पहिला आयफोन सादर केल्यानंतर आता दशकभराने कंपनीने पूर्णपणे नवी रचना असलेला आयफोन बाजारात आणला आहे....

बुधवार, 13 सप्टेंबर 2017