चिलीतील पाणी सर्वाधिक शुध्द 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

बाजारातील मिनरल वॉटरच्या बाटल्यांमधील पाणी सर्वांत शुद्ध असते, असा आपला समज असतो. जगात सर्वांत शुद्ध पाणी कुठे आढळते, हे तुम्हाला माहित आहे का? चिलीमधील प्वेर्टो विल्यम्स या शहरातील पाणी जगात सर्वाधिक शुद्ध असल्याचा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मागाल्लान्सच्या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्‍सासमधील संशोधकांच्या मदतीने या भागातील अनेक नद्या आणि इतर स्रोतांमधील पाण्याचे नमुने गोळा केले. या नमुन्यांचे विश्‍लेषण केल्यावर त्यांनी हा निष्कर्ष काढला. त्यासाठी संशोधकांनी वापरलेले उपकरण पाण्याच्या दहालाख अणूंमधील रसायनांचे दोन अणूही ओळखू शकते.

बाजारातील मिनरल वॉटरच्या बाटल्यांमधील पाणी सर्वांत शुद्ध असते, असा आपला समज असतो. जगात सर्वांत शुद्ध पाणी कुठे आढळते, हे तुम्हाला माहित आहे का? चिलीमधील प्वेर्टो विल्यम्स या शहरातील पाणी जगात सर्वाधिक शुद्ध असल्याचा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मागाल्लान्सच्या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्‍सासमधील संशोधकांच्या मदतीने या भागातील अनेक नद्या आणि इतर स्रोतांमधील पाण्याचे नमुने गोळा केले. या नमुन्यांचे विश्‍लेषण केल्यावर त्यांनी हा निष्कर्ष काढला. त्यासाठी संशोधकांनी वापरलेले उपकरण पाण्याच्या दहालाख अणूंमधील रसायनांचे दोन अणूही ओळखू शकते. मात्र, उच्च क्षमतेच्या या उपकरणालाही या पाण्यात काहीच आढळले नाही. प्वेर्टो विल्यम्स हे शहर चिलीच्या दक्षिणेकडील टोकाला असून, राजधानी सॅंटियागोपासून साडेतीन हजार किलोमीटर अंतरावर आहे. अंटार्टिक बायोकल्चरल कॉन्झर्वेशन प्रोग्रॅमचे संचालक रिकार्डो रोझ्झी यांच्या मतानुसार येथील पाण्याची शुद्धता आणि पर्यावरणाचे अस्तित्व औद्योगिक क्रांतीपूर्वीचे आहे. संशोधकांना या शहराबरोबरच चिलीतील टोरेस डेल पाइन राष्ट्रीय अभयारण्य आणि आग्नेय चीन, पश्‍चिम ऑस्ट्रेलिया आदी भागातील पाणीही अत्यंत शुद्ध असल्याचे आढळले. 
 

Web Title: chile water pure drinking water