'कॅशलेस' व्यवसायासाठी 'सिटीफाय'

cityfi app
cityfi app

शॉपिंगला बाहेर पडलाय...खिशात कार्ड आहे...मोबाईल वॉलेट ऍपही आहे... पण कुठल्या दुकानात कुठले कार्ड, वॉलेट स्वीकारले जाते हेच माहिती नाही, अशा परिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागते. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या "कॅशलेस इकॉनॉमी'मधील नेमकी हीच अडचण "सिटीफाय' या नव्या मोबाईल ऍपने दूर केली आहे. आपण ज्या भागात आहोत, त्या भागातील कोणत्या दुकानांमध्ये डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाते, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ई-वॉलेट ऍपपैकी कोणते ऍप त्या दुकानात चालू शकते, याची माहिती ग्राहकांना "सिटीफाय'मधून उपलब्ध करून दिली आहे.

येत्या काळात रोजच्या व्यवहारातील बहुतांश वस्तूंची खरेदी-विक्री कॅशलेस पद्धतीने होणार आहे. त्याची सुरवात नोव्हेंबरपासून झाली असून, त्यामुळे ग्राहकांपासून दुकानदारांपर्यंत सर्वांना "सिटीफाय'च्या रचनेत सहभागी करून घेतले आहे. पुण्यातील "थिंकबॅंक सोल्यूशन' या स्टार्ट अप कंपनीने "सिटीफाय'ची निर्मिती केली आहे. ""हे ऍप पूर्णतः "क्राउडसोर्स' पद्धतीवर चालते. लोकांनी लोकांच्या उपयोगाची माहिती लोकांसाठी भरावी आणि एकमेकांना सहकार्य करीत कॅशलेस इकॉनॉमीचे फायदे घ्यावेत, असा ऍपचा उद्देश आहे. गेल्या महिनाभरात आम्ही चारशेहून अधिक छोट्या-मोठ्या दुकानदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे कार्ड, ई-वॉलेट स्वीकारले जाते, याची माहिती मिळवली. ती ऍपमार्फत सर्वांना उपलब्ध करून दिली. आता हळूहळू ग्राहक या मोहिमेत सहभागी होत आहेत. आपण भेट दिलेल्या दुकानामध्ये कोणत्या पद्धतीने कॅशलेस व्यवहार होतात, याची माहिती सर्वसामान्य नागरिक ऍपमार्फत इतरांपर्यंत पोचवीत आहेत,'' असे "थिंकबॅंक'चे संस्थापक विनायक पाचलग यांनी सांगितले.

हे ऍप सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड आणि सोलापूर या दहा शहरांपुरते मर्यादित आहे. प्रतिसादानुसार ऍपची व्याप्ती वाढवत नेत आहोत, असेही पाचलग यांनी सांगितले.

लोकांनी लोकांसाठी...
दुकाने व इतर व्यवसायांबद्दल माहिती भरण्यापासून ते त्या माहितीची उपयुक्तता कितपत आहे, हे रेटिंगद्वारे ठरविण्यापर्यंत सर्व प्रक्रियांमध्ये युजरला "सिटीफाय'मध्ये थेट सहभागी करून घेतले आहे. एखाद्या व्यवसायाबद्दलची माहिती, संपर्क क्रमांक अथवा पत्ता चुकीचा असल्यास तसे युजर "डिसलाईक' करून कळवू शकतो.

काय आहे "सिटीफाय'?
- आपापल्या भागातील "कॅशलेस प्लेसेस'ची माहिती.
- किराणा दुकाने, रुग्णालये अशा विविध 16 व्यवसायांचा समावेश.
- ग्राहकांपर्यंत पत्ता, संपर्क क्रमांक पोचविण्याची दुकान मालकांसाठी व्यवस्था.
- व्यवसायाच्या नेमक्‍या वेळांचा समावेश.
- डेबिट-क्रेडिट कार्डसह पेटीएम, मोबीक्विक, फ्रीचार्ज आणि जीओ मनीचा समावेश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com