संगणक ओळखणार मानवी भावना 

Computer recognize human emotions
Computer recognize human emotions

तंत्रज्ञान, संगणक आदींनी कितीही प्रगती केली, तरी त्यामुळे भावना बाजूला पडून कोरडेपणा वाढल्याची तक्रार नेहमीच केली जाते. आता संशोधक या वरही मात करण्याचा प्रयत्न करत असून,"आयबीएम'ने मानवी भावना समजू शकणारा संगणक विकसित केला आहे. वॅटसन या सुपर कॉम्प्युटरमध्ये मोठे फेरबदल करून मानवी भावना ओळखणारी क्षमता विकसित केल्याचे कंपनीने म्हटले आहे. या फेरबदलांमुळे तो अधिक वेगवान झाला असून, आता तो मानवी भावनाही ओळखू शकेल. त्याचप्रमाणे कमांड देताच वॅटसन यूजरच्या मूडचे विश्‍लेषण करू शकेल, असा दावा आयबीएमने केला आहे.

संगणकाचा टोन ऍनालायझर बऱ्याच प्रमाणात विकसित झाला असून, वॅटसन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या श्रेणीत यूजरच्या लिखाणावरून त्याच्या भावना ओळखू शकेल. याशिवाय वॅटसनमध्ये इमोशन ऍनॅलिसिस आणि व्हिज्युअल रेगक्‍झिनेशन या तंत्राचाही समावेश केला आहे. यूजरकडून संगणकावर टाइप केल्या जाणाऱ्या मजकुराचे वॅटसन सखोल विश्‍लेषण करेल. या विश्‍लेषणाच्या आधारे तो यूजरची जवळपास प्रत्येक भावना ओळखण्यात यशस्वी होईल, यूजरने संगणकावर काम करण्यासाठी की-पॅडवर प्रेस करताच तो यूजरला फॉलो करेल, अशी माहिती आयबीएमने दिली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com