स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड!

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

आपल्या टचस्क्रीन स्मार्टफोनवर टायपिंगसाठी आता लवकरच "डिटॅचेबल की-बोर्ड' उपलब्ध होणार आहे. अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी टचस्क्रीन फोनला जोडता येणारा "टायपो की-बोर्ड' तयार केला आहे. हा की-बोर्ड फोनच्या खालच्या बाजूने जोडून ब्लूटूथद्वारा फोनला जोडता येतो. मागील बाजूने पाहिल्यास तो फोनचे कव्हर असल्यासारखा दिसतो. ऍपल फोनला हा की-बोर्ड जोडल्यास त्याची जाडी पाव इंचाने वाढते, तर लांबी एक इंचाने वाढते. ""हे डिझाईन तयार करताना आम्ही टायपिंग करात येईल, फोनला संरक्षणही मिळेल व आयफोनची लांबी व जाडी कमीत कमी वाढेल, हा विचार प्रामुख्याने केला होता,'' असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

आपल्या टचस्क्रीन स्मार्टफोनवर टायपिंगसाठी आता लवकरच "डिटॅचेबल की-बोर्ड' उपलब्ध होणार आहे. अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी टचस्क्रीन फोनला जोडता येणारा "टायपो की-बोर्ड' तयार केला आहे. हा की-बोर्ड फोनच्या खालच्या बाजूने जोडून ब्लूटूथद्वारा फोनला जोडता येतो. मागील बाजूने पाहिल्यास तो फोनचे कव्हर असल्यासारखा दिसतो. ऍपल फोनला हा की-बोर्ड जोडल्यास त्याची जाडी पाव इंचाने वाढते, तर लांबी एक इंचाने वाढते. ""हे डिझाईन तयार करताना आम्ही टायपिंग करात येईल, फोनला संरक्षणही मिळेल व आयफोनची लांबी व जाडी कमीत कमी वाढेल, हा विचार प्रामुख्याने केला होता,'' असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. ""आमचे काही मित्र टायपिंगसाठी एक फोन व दुसरा आयफोन इतर कामांसाठी वापरत होते. मी माझ्या मित्राबरोबर जेवायला बाहेर गेलो तेव्हा आमच्या टेबलवर दोन माणसे आणि चार फोन होते. यातूनच टायपो की-बोर्डची कल्पना सुचली,'' असे कंपनीच्या या प्रकल्पावरील संशोधकांनी स्पष्ट केले. हा की-बोर्ड आयफोनसाठी लॉंच केला आहे.
 

Web Title: detachable keyboard case for smartphones