विद्यार्थांसाठी तयार केले 'Digital Fun Math' अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशन

prakash-chavhan
prakash-chavhan

निफाड (नाशिक) - बोरस्तेवस्ती येथील शिक्षक प्रकाश चव्हाण यांची निर्मिती असलेले 'हसत खेळत डिजिटल शिक्षण' चे 'Digital Fun Math' अॅन्ड्रॉइड अॅप्लीकेशन निफाड पंचायत समिती सभापती पंडित आहेर यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.

यावेळी पिंपळगाव बसवंत येथे पिंपळगाव बिटातील कोकणगाव, पिंपळगाव, पालखेड केंद्राची बीटस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सबलीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात बोरस्तेवस्ती शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांनी विद्यार्थ्याना सहज हाताळता येणाऱ्या अध्ययन फलकाच्या साहाय्याने स्वयं अध्ययन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करत गणित सहज पद्धतीने कसे शिकवावे हे सांगितले. या शाळेच्या विध्यार्थ्यांनी अध्ययन फलकावर विविध उपक्रम सहज व आत्मविश्वास पूर्वक सादर केले.

उद्घाटन प्रसंगी निफाड पंचायत समिती सभापती पंडित आहेर, राजेंद्र पाटील, आनंद पवार, पं.स.सदस्य बागुल, विस्तार अधिकारी संजय चव्हाण, केंद्रप्रमुख भास्कर बोरसे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

काय आहे 'Digital Fun Math' ?
हे एक ऑफलाईन अॅन्डरॉइड अॅप्लीकेशन असून, पहिली ते चौथीच्या गणिताच्या सर्व क्रिया यामध्ये आहेत. त्यामुळे विद्यार्थी हसत खेळत गणित शिकतील या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेले आहे. यातील गणिती पाटीवर विद्यार्थ्यांना बोटाने लिहिण्याची संधी मिळणार असून, मोबाईल हलवला की लिहिलेले पुसले जाणार आहे. त्यामुळे मुलेआपल्या पालकाच्या अॅन्डरॉइड  मोबाईलवर स्वयं अध्ययन करु शकतील. गणिती क्रिया समजून घेणे त्यांच्यासाठी सोपे होईल. हे अॅप्लीकेशन    फक्त ४ 'एमबी'चे असून, प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

प्रकाश चव्हाण यांनी इयता १ ते ५ वर्गाच्या मराठी विषयाच्या प्रत्येक पाठावर 'कोण होईल विजेता?' 'गेमशो' व मुलांना अध्यापनासाठी प्रवृत्त करण्यासाठी 'क्लिक करूया' सारखे अनेक डिजिटल 'अॅप्लीकेशन' तयार केलेले असून, ते व्हॉट्सअॅपवर राज्यभरातील शिक्षक पालक विद्यार्थ्यांना मोफत दिलेले आहेत. या अॅप्लीकेशनमुळे मुलांचे दप्तराचे ओझे कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

''सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. प्रकाश चव्हाण हे बोरस्ते वस्ती शाळेच्या विध्यार्थ्यांना देत असलेली तंत्रज्ञानाची अनुभूती प्रेरणादाई आहे. इतर शाळा व शिक्षकांनी त्यांच्या कामातुन प्रेरणा घ्यावी. आपले काम स्मार्ट पद्धतीने करावे''
पंडित अहिरे, सभापती पंचायत समिती निफाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com