काय, जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप नाही…?

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

यूट्यूबर टेक्निकल गुरुजीच्या मते, जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप नसेल. मात्र रिलायन्स जिओच्या फीचर फोनमध्ये युट्यूब आणि फेसबुक वापरता येणार आहे. देशात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रिलायन्स जिओचा 4जी फीचर फोन व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची नक्कीच निराशा करणार आहे.

मुंबई : रिलायन्स जिओच्या 4जी फीचर फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतोय. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकी दरम्यान मोफत जिओ फोन देण्याची घोषणा करून सर्वत्र धमाका केला आहे. सर्वांच्या मनात जिओचा फोन कसा असेल याबद्दल सध्या उत्सुकता आहे. मात्र जिओच्या फोनकडून तुमची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्याची सोय नसेल.

यूट्यूबर टेक्निकल गुरुजीच्या मते, जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप नसेल. मात्र रिलायन्स जिओच्या फीचर फोनमध्ये युट्यूब आणि फेसबुक वापरता येणार आहे. देशात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रिलायन्स जिओचा 4जी फीचर फोन व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची नक्कीच निराशा करणार आहे.

रिलायन्स जिओने देशभरात 50 कोटी ग्राहकांना जिओचा फीचर फोन विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी जिओने त्यांच्या 4जी फीचर फोनचे 'प्री बुकिंग' सुरू केले आहे. रिलायन्स जिओचे 'जिओ.कॉम' या संकेतस्थळावर प्राथमिक माहिती भरून 'प्री बुकिंग' सुरू करता येणार आहे. संकेतस्थळावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर रिलायन्स जिओच्या जी फीचर फोनसाठी 'रजिस्ट्रेशन' होऊ शकणार आहे.

मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्सच्या वार्षिक बैठकी दरम्यान जगातील सर्वात स्वस्त म्हणजे रिलायन्स जिओकडून मोफत देण्यात येणार्‍या फोनचे लॉंचिंग केले. रिलायन्सने जिओचा हा फोन फ्री उपलब्ध करून दिला आहे. मात्र यासाठी सुरक्षा ठेव म्हणून 1500 रुपये रिलायन्सकडून घेतले जाणार आहे. मात्र हे 1500 रुपये 3 वर्षांनंतर परत (रिफंड) देण्यात येणार आहे.