व्हॉट्सअॅप बंद पडलं; तासाभरानं पुन्हा सुरू !

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

याबाबत व्हॉट्सअॅपद्वारे आणखी अधिकृत माहिती काही सांगण्यात आलेली नाही. अशाप्रकारे अचानक सेवा बंद पडल्याने फक्त भारतातच नाही तर जगभरातील युजर्सना याचा त्रास सहन करावा लागला. 

नवी दिल्ली- भारतासह जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपची सेवा आज दुपारी दोनच्या आसपास ठप्प झाली होती. अखेर तासाभरानंतर व्हॉट्सअप पुन्हा सुरु झालं. 

याबाबत व्हॉट्सअॅपद्वारे आणखी अधिकृत माहिती काही सांगण्यात आलेली नाही. अशाप्रकारे अचानक सेवा बंद पडल्याने फक्त भारतातच नाही तर जगभरातील युजर्सना याचा त्रास सहन करावा लागला. 

दुपारी दोनच्या दरम्यान युजर्सना व्हॉट्सअॅपवर मेसेज जात नसल्याचे लक्षात आले. बऱ्याच जणांनी सुरवातीला इंटरनेट डाउन असेल असं समजुन दुर्लक्ष केलं तर काहींनी व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करुन पुन्हा डाउनलोड करुन बघितले. परंतु तरीही व्हॉट्सअॅप सुरु होत नव्हते. त्यानंतर फेसबुक आणि ट्विटरवर व्हॉट्सअॅप बंद पडल्याच्या पोस्ट येण्यास सुरवात झाली.
 
अवघ्या काही मिनिटांमध्येच ट्विटरवर #whatsappdown हा हॅशटॅग ट्रेंड झाला. व्हॉट्सअॅप बंद पडल्याने त्यावर वेगवेगळे जोक्स सुद्धा येण्यास सुरवात झाली. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपची सेवा अल्पावधीसाठी ठप्प झाली होती.