आता व्हॉट्सअॅप ठेवणार फेक मेसेजवर अंकुश...

whatphoto
whatphoto

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात व्हॉट्सअॅपवरून फिरणाऱ्या फेक मेसेजमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. आता त्यावरच अंकुश ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर आणत आहे. या फिचरमुळे फेक मेसेजला आळा बसणार आहे.

व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपमध्ये जे काही मेसेज पाठवले जातील त्यातील माहिती पडताळून पाहण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. या फिचरद्वारे वैध माहिती ही मंजूर केली जाईल, तर काही फेक किंवा खोटी माहिती व्हायरल होण्यापूर्वी ती नाकारता येईल. देशभरात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय आहे, असे मेसेज व्हायरल झाले व यामुळे तब्बल 29 जणांना आपले जीव विनाकारण गमवावे लागले. अशा घटना थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅप आता हे फिचर लॉन्च करणार आहे.     

जेव्हा हे फिचर लॉन्च होईल, त्यावेळी 'आपण एकत्र येऊन बनावट किंवा फेक मेसेजवर अंकुश मिळवू' अशा आशयाची जाहिरात केली जाणार आहे.

या कारणांसाठी हे फिचर लॉन्च करण्यात याणार आहे - 
- जी माहिती खोटी वाटू शकते त्याची पडताणळी करण्यासाठी.
- व्हॉट्सअॅपवर जे फोटो व्हायरल होतात त्याचे परिक्षण करण्यासाठी.
- आपल्याला अडचण असणाऱ्या कोणत्याही माहितीवर प्रश्न विचारू विचारण्यासाठी. 
- विचित्र वाटणाऱ्या माहितीपासून लांब राहण्यासाठी.
- माहिती कुठून व्हायरल होते, हे शोधण्यासाठी.

केंद्र सरकारने सूचना केल्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये हे बदल करण्यात येणार आहेत. व्हॉट्सअॅपवरून असे मेसेज व्हायरल होणे हे देशासाठी धोकादायक आहे, त्यामुळे त्याला आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी व्हॉट्सअॅपच्या व्यवस्थापन मंडळाने असे फेक मेसेज व्हायरल होऊ नयेत, त्याला आळा बसणार यासाठी उपायोजना आखायला सुरवात केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com