'योगा'संबंधी माहिती देणाऱ्या ऍप्स

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

आज संपूर्ण जगात दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे तीस हजार नागरिकांसोबत योगदिन साजरा केला. मोदी यांनी "आपल्या मोबाईल फोनप्रमाणे आपण योगाला समाविष्ट करून घ्या‘ असे आवाहन मोदी यांनी यावेळी बोलताना केले. 

यानिमित्ताने "योग‘शी संबंधित काही ऍप्सची माहिती -

आज संपूर्ण जगात दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे तीस हजार नागरिकांसोबत योगदिन साजरा केला. मोदी यांनी "आपल्या मोबाईल फोनप्रमाणे आपण योगाला समाविष्ट करून घ्या‘ असे आवाहन मोदी यांनी यावेळी बोलताना केले. 

यानिमित्ताने "योग‘शी संबंधित काही ऍप्सची माहिती -

डेली योगा
हे ऍप म्हणजे मोठे ग्रंथालयच आहे. यात 500हून अधिक आसनांची माहिती, एचडी फॉरमॅटमधील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. प्रत्येक व्हिडिओला सुश्राव्य मंद संगीताची जोड दिली असून पहिल्यांदाच योगासने सुरू करणाऱ्यांसाठी हे ऍप चांगला पर्याय आहे. हे आणखी इतर अद्ययावत माहिती पुरवते. हे ऍप ऍन्ड्रॉईड 3.0 आणि त्यापुढील ओएससाठी उपलब्ध आहे. 

युनिव्हर्सल ब्रिदिन 
प्राणायाम ऍप : योगासनांमधील सर्व आसने ही श्‍वसनावर आधारित आहेत. या ऍपमध्ये प्राणायामाच्या विविध पध्दती, नियंत्रणाविषयी माहिती देते. ऍनिमेशन स्वरुपातील मार्गदर्शक सुविधा तुम्हाला येथे उपलब्ध आहे. युजर कमीत-कमी वेळात करण्यायोगे प्राणायामाचे प्रकार शॉर्टलिस्ट करून देते. युजर्सच्या प्राणायामाच्या अभ्यासाचा ट्रॅक ठेवण्याचे काम करते. हे ऍप ऍन्ड्रॉईडच्या2.3 आणि पुढील श्रेणींसाठी उपलब्ध आहे. 

बाबा रामदेव
भारतात योग आणि रामदेव म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असे चित्र दिसते. बाबा रामदेव यांच्या ऍपमध्येही सर्व आसने आणि प्राणायाम मुद्रा व्हिडिओसहित उपलब्ध आहेत. याशिवाय फॅट कमी करण्यासाठी तसेच उच्च रक्तदाब,मधुमेह यासारख्या विशिष्ट रोगासाठी योगासने, प्राणायाम यांचे वेगळे व्हिडिओ यावर उपलब्ध आहेत. 

नॅचरल फेसलिफ्ट
महिलांसाठी हे ऍप अतिशय उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी फेशियल योगा महत्वाचा ठरतो. जगातील बहुतेक महिला स्किनकेअर उत्पादनांवर सर्वाधिक खर्च करतात. त्याऐवजी चेहऱ्याचे काही व्यायाम केल्यास चेहरा आणखी टवटवीत दिसेल. हे ऍप तुम्हाला फक्त दहा सोपे व्यायाम सांगितले आहेत. यामुळे चेहऱ्यावरील फॅट्‌स कमी होण्यास मदत होते. या ऍपचे वैशिष्ट्य म्हणजे ते 85 भाषांमधून माहिती देते. या भाषांमध्ये इंग्रजी आणि हिंदी या भाषांचादेखील समावेश आहे. 

पॅरेंट योगा
योगासनांचा सर्वाधिक उपयोग महिलांना असल्याने त्यांच्या आरोग्यातील महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे गरोदर काळात आणि त्यानंतर गर्भवती महिलांनी बाळाची तसेच स्वत:ची कशीे काळजी घ्यावी, कोणती योगासने करायची याची विस्तृत माहिती यांत दिली आहे. याशिवाय तज्ज्ञांशी सवांद साधण्याची संधी यात युजर्सना मिळते. हे ऍप विविध भाषांमधून उपलब्ध आहे. 

याशिवाय योगाचार्य अय्यंगार यांच्या फाऊंडेशनचे बीकेएस अय्यंगार योगा हे संकेतस्थळावरही योगाबाबत माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर योगासनांची इत्यंभूत माहिती आठ वेगवेगळ्या विभागात दिली आहे.