गुगल असिस्टंटशी लग्न करण्यास 4.5 लाखांहून अधिकजण तयार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गुगलची 'गुगल असिस्टंट' ही सुविधा सध्या चांगलीच लिकप्रिय आहे. यामध्ये आपण कोणतीही शब्द उच्चारला की त्याची सगळी माहिती गुगलवर एका महिलेच्या आवाजात आपल्याला मिळते. या महिलेचा आवाज भारतीयांसाठी अतिशय खास आहे. कारण या महिलेचा आवाज भारतीयांना खूप आवडतो असे नुकतेच समोर आले आहे. इतकेच नाही तर या महिलेशी लग्न करण्यासाठी तब्बल 4 लाख 50 हजार जण तयार आहेत. गुगल प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष ऋषी चंद्रा यांनी याबबात माहिती दिली आहे.

भारतात लोकांना एखादी गोष्ट टाईप करण्यापेक्षा बोलून सर्च करणे जास्त आवडत असल्याचे गुगलने म्हटले आहे. त्यामुळे 'गुगल असिस्टंट' भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. गुगल होम आणि गुगल होम मिनी या दोन्हीमध्येही गुगल स्पिकरतर्फे व्हॉईस असिस्टंट सुविधा देण्यात येत आहे. ही सुविधा सध्या केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असून येत्या काळात ती हिंदीमध्येही उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Google’s Assistant has received 4.5 lakh marriage proposals in India