आता शालेय अभ्यासक्रमातही इंटरनेट सुरक्षा 

पीटीआय
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमात इंटरनेट सुरक्षेचा समावेश करण्यासाठी गुगल चार ते पाच राज्यांशी चर्चा करत आहे. अमेरिकास्थित गुगल या कंपनीने यापूर्वीच गोवा सरकारसोबत शालेय मुलांना इंटरनेटवर सुरक्षित राहण्याचे धडे देण्यास सुरवात केली असून, आता आणखी काही राज्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. 

आम्ही सध्या गोवा सरकारसोबत हा कार्यक्रम राबवत असून, आता आम्ही तो आणखी काही राज्य सरकारांसोबतच केंद्रीय विद्यालयांतही राबविणार असल्याचे गुगल इंडियाच्या ट्रस्ट ऍण्ड सेफ्टीच्या संचालिका सुनीता मोहंती यांनी सांगितले. यामध्ये सध्या चार ते पाच राज्यांचा विचार सुरू असून, लवकरच त्यांचा समावेश या कार्यक्रमात होणार आहे. मोहंती यांनी संबंधित राज्यांची नावे जाहीर केली नसली तरी, गोव्यातील सुमारे 460 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन याबाबत सुमारे 80 हजार विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षेचे शिक्षण देण्यासोबतच महिला आणि ग्राहक यांनाही गुगल शिक्षण देत आहे. ग्राहक इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करत असताना त्यांना याचे शिक्षण फायदेशीर ठरते व ते सुरक्षित राहतात, असे मोहंती यांनी या वेळी सांगितले. 
 
Web Title: Google joins hands with Goa Education Board to include Internet Safety subject into school curriculum