आयफोन-7 युजर्सना जिओची पंधरा महिने मोफत सेवा

iPhone
iPhone

नवी दिल्ली : सध्या मुंबई-पुण्यामध्ये आयफोन-7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड गर्दी होत असताना मुकेश अंबानीच्या "जिओ‘ या 4G नेटवर्कची सेवा वर्षभर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

आयफोन युजर्सना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रिलायन्स ‘जिओ‘ 4G सेवेच्या "वेलकम प्लान‘ची क्रेझ अजूनही स्मार्टफोन युजर्समध्ये कायम आहे. हा प्लॅन 31 डिसेंबर 2016 पर्यंत मर्यादित असून आयफोन युजर्सना मात्र ही 4जी सेवा 15 महिने म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त दिवस घेता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रिलायन्स रिटेल,ऍपल स्टोअरमधून कोणतेही ऍपल डिव्हाईस घेतल्यानंतर रिलायस जिओ नेटवर्क वापरल्यास त्यांना ‘वेलकम ऑफर‘चा लाभ घेता येईल. 

एक जानेवारीपासून आयफोन युजर्सना 1499 रुपयाचा प्लान पूर्णपणे मोफत असेल. हा प्लान अठरा हजार रुपयाच्या किंमती इतका आहे. या प्लानमध्ये अमर्याद एसटीडी कॉल्स, व्हॉईस कॉलिंग,नॅशनल रोमिंग, 4जी डेटा, 20 जीबीपासून पुढे, रात्री 4जीसाठी 40 जीबी डेटा, अमर्याद एसएमएस, अमर्याद जिओ ऍपचे सबस्क्रिपशन यांचा समावेश आहे.

ऍपल युजर्स जिओ नेटवर्कच्या साह्याने शंभर टक्के फोरजीचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये उच्च दर्जाचे व्हॉईस कॉल,हाय डेफिनेशन फेसटाइम कॉल्स, बफर फ्री एचडी व्हिडिओ तसेच 300 लाइव्ह टिव्ही बघता येतील. रिलायन्स जिओमुळे इतर नेटवर्किंग कंपन्यांमधील स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. एअरटेल कंपनीने त्यांच्या इन्फिनिटी पोस्टपेड प्लानमध्ये महिनाभर थ्रीजी आणि फोरजीवर 10 जीबीपर्यंतचा डेटाचा एक वर्षभरापर्यंत लाभ घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com