मेडिकल कोडिंग आणि विमा नियोजन

प्रथमेश देशपांडे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

आरोग्यसेवेतील मेडिकल कोडर्स व बिलर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हेल्थकेअर आउटसोर्सिंगसाठी अमेरिका व इतर युरोपीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अमेरिकेनंतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची उपलब्धता व स्वस्त बाजारपेठ म्हणून भारतीय हेल्थकेअर कंपन्यांची ओळख निर्माण होत आहे. मेडिकल कोडिंग म्हणजे काय याबद्दल थोडक्‍यात. 

कोडर्स डॉक्‍टरांकडून वैद्यकीय अहवाल घेतात ज्यामध्ये रुग्णाला झालेल्या आजाराची माहिती, डॉक्‍टरांनी केलेले निदान किंवा डॉक्‍टरांनी केलेली शस्त्रक्रिया याची नोंद असते. ही माहिती एका 'कोड'च्या संचामध्ये लिहिली जाते. या मेडिकल कोडिंगचा उपयोग विम्याचा दावा (क्‍लेम) भरण्यासाठी केला जातो. मेडिकल कोडिंग व्यवसायाचा उपयोग वेगळ्या पद्धतीनेही केला जातो.

मेडिकल कोडिंगमुळे तयार झालेल्या 'डेटा'च्या आधारे आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना अधिक योग्य निदान करता येते. मेडिकल कोडिंगमुळे पॉलिसी निर्मात्यांना आणि सार्वजनिक आरोग्य खात्याला रोगासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळू शकते आणि संसाधनांचे योग्य प्रकारे वाटप करता येऊ शकते. रोगग्रस्त लोकांची माहिती मिळाल्यामुळे निधी योग्य प्रकारे वापरला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मृत्यूदर आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवांचा मागोवा घेण्यासाठी मेडिकल कोडिंगचा अधिकाधिक वापर केला आहे. 

मेडिकल कोडिंगचे क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मेडिकल कोडर्स हे भारतात आहेत. आरोग्यसेवा आउटसोर्सिंग सेवा देणाऱ्या काही भारतीय कंपन्यांची उलाढाल ही पुढील तीन ते पाच वर्षांत 40 कोटी डॉलरच्या घरात जाण्याची अपेक्षा आहे. खासगी विमा क्षेत्राच्या विकासामुळे देशातील आरोग्यसेवेचा उपयोग वाढू शकतो.

विमा आणि आरोग्यसेवेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला मेडिकल कोडिंग व बिलिंगदेखील करावे लागू शकते. त्यामुळे अशी आशा आहे, की केंद्र सरकार आरोग्य विमा व मेडिकल कोडिंगच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेईल.