कॅन्सर रोखणार सिन्थेटिक जीन सर्किट

Marathi news science news in Marathi cancer synthetic circuit
Marathi news science news in Marathi cancer synthetic circuit

रोगप्रतिकारक पेशींना चालना देऊन त्यांना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करणारी व्यवस्था मानवी शरीरात बसविणे नजिकच्या काळात शक्य होणार आहे. तसे संशोधन 'एमआयटी' या जगप्रसिद्ध संस्थेतील संशोधकांनी केले आहे. 

कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच रोगप्रतिकार पेशींना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्याची सूचना देता येऊ शकेल, असे सिन्थेटिक जीन सर्किट संशोधकांनी विकसित केले आहे. या संशोधनाबद्दल 'सेल' या विज्ञानविषयक नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. 

रोगप्रतिकारक पेशींवर उपचाराची पद्धती कॅन्सरला रोखण्यात महत्वाची मानली जाते. या पद्धतीच्या चाचण्या घेतल्या आहेत, असे 'एमआयटी'मधील बायोलॉजिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहप्राध्यापक टिमोथी लू यांनी सांगितले. 

'आतापर्यंतच्या चाचण्यांवरून काही एक माहिती गोळा झाली आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य पद्धतीने सजग केल्यास त्या कॅन्सरपेशींना 'ओळखू' शकतात. कॅन्सरच्या पेशी स्वतःच्या बचावासाठी विशेष व्यवस्था राबवितात. आपल्यावर इतर पेशींनी हल्ला करू नये, अशी सूचना देणारे जणू फलकच त्या घेऊन वावरतात. ही एकप्रकारची सिग्नल व्यवस्था असते. ती नष्ट करणाऱया अँटीबॉडीज् विकसित झालेल्या आहेत. एकदा हा सिग्नल कॅन्सर पेशींवरून हटला, की रोगप्रतिकारक पेशींचा हल्ल्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्या कॅन्सर पेशींना संपवू शकतात,' असे लू यांचे संशोधन सांगते. 

'एमआयटी'चे संशोधन कॅन्सरविरुद्धच्या लढाईत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. स्वित्झर्लंडमधील संशोधक मार्टिन फुसेंनेगर यांच्या मते 'सिन्थेटिक जीन सर्किट हे स्मार्ट तंत्रत्रान आहे. विविध घटक एकत्र करून ट्युमर पेशींवर हल्ल्यासाठी रोगप्रतिकारक पेशींना सज्ज करण्याची पद्धत भविष्यात उपयोगी ठरणार आहे,' असे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com