मालक जैसा बोले; रोबोट तैसा चाले...!

Marathi news science technology news in Marathi Toyota Robot T HR3
Marathi news science technology news in Marathi Toyota Robot T HR3

'अवतार' या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटातील सैन्य रोबोट वापरते. अफाट ताकदीच्या यंत्रांमध्ये सैनिक बसतात आणि सैनिक जशा हालचाली करतील, तशा हालचाली हा यांत्रिक रोबोट करतो. माणसाच्या एका बोटात ताकद अशी ती किती असणार? मात्र, हीच कृती रोबोटचे बोट करते, तेव्हा लोखंडाच्या तुकड्यालाही छेद जातो. चित्रपटातील कल्पना काही काळाने वास्तवात उतरतात, असा आजवरचा वैज्ञानिक इतिहास आहे. 'अवतार'मधील रोबोटबाबतही असेच काहीसे घडू पाहते आहे. टोयोटाने घोषणा केलेला नवीन रोबोट टी-एचआर3 भले सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यासाठी बनवला आहे, मात्र त्याच्या हालचाली पाहिल्या, तर 'अवतार'च्या रोबोटची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

मानवासारखा दिसणाऱया टी-एचआर3 या नव्या रोबोटची घोषणा टोयोटा कंपनीने नुकतीच केली. दीड मीटर उंचीचा हा रोबोट 75 किलो वजनाचा आहे आणि त्याच्या दोन्ही हातांना मिळून दहा बोटे आहेत. संतुलन आणि दिशेचे ज्ञान या दोन्ही बाबतीत आधीच्या रोबोटपेक्षा टी-एचआर3 सरस मानला जात आहे. 

जपानमधील मोठ्या कंपन्या रोबोटवरील संशोधनात आघाडीवर आहेत. त्यामध्ये टोयोटाने विशेष काम केले आहे. मात्र, प्रॉडक्ट पूर्ण झाल्याशिवाय त्याची कोणतीही माहिती जाहीर करण्याची टोयोटाची प्रथा नाही. टी-एचआर3 बाबतही टोयोटाने नेमके हेच केले आहे. टी-एचआर सिरिजमधील तिसरा रोबोट जाहीर करताना टोयोटाने या रोबोटमुळे माणसांच्या हालचालींच्या विशिष्ट गरजा पूर्ण होतील, असा दावा केला आहे. टी-एचआर सिरिजमधील आधीचे रोबोट विविध प्रकारची वाद्ये वाजवू शकत होते. टी-एचआर3 हा त्यापुढे जाऊन विविध हालचाली सहजपणे करू शकतो आहे. 

मास्टर मन्यूव्हरिंग सिस्टिम टी-एचआर3 रोबोट वापरता येतो. सिस्टिमवर बसलेली व्यक्ती ज्या पद्धतीने हालचाली करेल, त्या सर्व हालचाली टी-एचआर3 रोबोट करतो. सिस्टिम वापरणाऱया व्यक्तीला रोबोटच्या 'डोळ्यांतून' समोरचे दृष्य पाहता येते. 'टी-एचआर3' रोबोट वापरायला सोपा आहे. मानवासोबत राहू शकेल, असा आहे. हा रोबोट माणसांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करू शकेल. या रोबोटमध्ये आणखी सुधारणा जरूर होतील,' असे टोयोटाच्या पार्टनर रोबोट विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com