'ऍमेझॉन'चे 'एनिटाईम' करणार 'व्हॉट्‌सऍप'शी स्पर्धा 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

'ई कॉमर्स'मध्ये अग्रभागी असलेल्या 'ऍमेझॉन'ने आता 'मेसेजिंग'च्या क्षेत्रातही उडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मेसेजिंगसाठी 'एनिटाईम' नावाचे मोबाईल ऍप्लिकेशनवर सध्या जोरदार काम सुरू असून येत्या काही दिवसांमध्येच 'ऍमेझॉन' हे ऍप्लिकेशन उपलब्ध करून देईल. 

'एनिटाईम'साठी 'ऍमेझॉन'ने काही युझर्सकडून सर्वेक्षणही करून घेतले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. यातील माहितीनुसार, 'एनिटाईम' आता सर्वसामान्य युझर्सच्या वापरासाठी आता पूर्ण सज्ज झाले आहे. यामध्ये व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, फोटो शेअर करण्याची सुविधा, फिल्टर्स इत्यादी सोयीही असणार आहेत. याशिवाय ऑनलाईन गेम खेळणे, खाद्यपदार्थांची ऑर्डर देणे अशा सुविधाही यात उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, काही युझर्स मिळून एकत्रितरित्याही या सुविधा वापरू शकणार आहेत. 

स्मार्टफोनवरील मेसेजिंगच्या क्षेत्रामध्ये 'ऍमेझॉन'साठी 'व्हॉट्‌सऍप' आणि 'फेसबुक'च्या मेसेंजर हे दोन महत्त्वाचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. काही महिन्यांपूर्वी 'गुगल'नेही मेसेजिंगमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला होता; पण 'व्हॉट्‌सऍप' आणि 'मेसेंजर'च्या लोकप्रियतेला धक्का देण्यात त्यांना यश आले नाही.

आता 'व्हॉट्‌सऍप'च्या माध्यमातूनही विविध सेवा-सुविधा पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे साध्य झाल्यास या क्षेत्रात पाय रोवण्यात 'ऍमेझॉन'ला आणखी अडचणी येऊ शकतात.