iPhone 8 खरेदी करायचाय? मग आधी हे पाहा...

Marathi news technology news in marathi iphone 8 vs iphone 7
Marathi news technology news in marathi iphone 8 vs iphone 7

गेल्या आठवड्यात अॅपलने नव्या मोबाईल फोनची घोषणा केली आणि आयफोन 8 ची चर्चा सुरू झाली. 'आयफोन' मुळात इतर मोबाईल फोनपेक्षा महागडा; मात्र सुविधांमुळे जगभरात सुमारे 70 कोटी जनता आयफोन वापरते. हा आकडा मार्चपर्यंतचा. त्यापैकी सुमारे 22 कोटी लोक सेकंड हँड आयफोन वापरतात. आधीचा आयफोन विकून नवा घेणाऱयांचे प्रमाण अॅपल ग्राहकांमध्ये सातत्याने जास्त राहिले आहे. त्यामुळेच, आयफोन 7 आणि आयफोन 8 यामध्ये नेमका फरक काय आहे, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. 'फोर्ब्ज्'ने यासंदर्भात विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. 

डिझाईन
आयफोन 8 हा आयफोन 7 पेक्षा आकाराने किंचित मोठा आहे आणि वजनाने 7 टक्के अधिक आहे. आयफोन 8 ची मागील बाजू नेहमीसारखी अॅल्युमिनियमची नाही; तर काचेची आहे. त्यामुळे 7 टक्के वजन वाढले आहे. 

आयफोन 8

  • आकार : 138.4 x 67.3 x 7.3 मिलीमीटर (5.45 x 2.65 x 0.29 इंच) 
  • वजन : 148 ग्रॅम 

आयफोन 7 

  • आकार : 138.3 x 67.1 x 7.1 मिलीमीटर (5.44 x 2.64 x 0.28 इंच) 
  • वजन : 138 ग्रॅम

डिस्प्ले
'फोर्ब्ज्'च्या संशोधनात आयफोन 8 आणि आयफोन 7 च्या डिस्प्लेमध्ये मोजण्यासारखा काही फरक आढळला नाही. 

आयफोन 8 आणि आयफोन 7 : 4.7-इंच LED-backlit IPS LCD, 1334 x 750 pixels (326 ppi), 65.6% स्क्रिन-टू-बॉडी रेश्यो

परफॉर्मन्स
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस हे आतापर्यंत जगातील सर्वाधिक वेगवान मोबाईल होते. मात्र, त्याची जागा आता आयफोन 8 घेईल. आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन एक्स् या तिन्ही फोनमध्ये अॅपल ए11 बायोनिक चिप आहे. त्याशिवाय, Six Core CPU, Six Core GPU, M11 motion coprocessor, 3GB RAM (आयफोन एक्स, आयफोन 8 प्लस), 2GB RAM (आयफोन 8) या स्पेसिफिकेशनचा मोबाईल नजिकच्या काळात अॅपलवगळता अन्य कोणाकडे मिळणे अवघड आहे. अॅपलच्या दाव्यानुसार, आयफोन 7 पेक्षा आयफोन 8 तब्बल 25 टक्के अधिक वेगवान आहे. 

कॅमेरा
कॅमेऱयामध्ये फारसे बदल अॅपलने केलेले नाहीत. आयफोन 8 मध्ये 12 मेगापिक्सचा वाईड-अँगल कॅमेरा आहे. मागच्या बाजूला ड्युएल कॅमेरा नसलेला नव्या श्रेणीतला आयफोन 8 एकमेव फोन आहे. 

बॅटरी
आयफोन 8 ची बॅटरी जास्त काळ टिकेल, अशी अपेक्षा नको मात्र जलद आणि वायरलेस चार्जिंगची व्यवस्था आहे. आयफोन 7 इतकीच आयफोन 8 ची बॅटरी चालेल, असे खुद्द अॅपलने मान्य केले आहे. वायरलेस चार्जिंग नको असेल, तर जास्तीचे पैसे मोजून चार्जर विकत घ्यावा लागणार आहे. 

स्टोरेज आणि किंमत
आयफोन 8 मध्ये स्टोरेज वाढले आहे; मात्र, त्याचवेळी किंमतही वाढली आहे. 

  • आयफोन 8 - 64GB (अमेरिकी बाजारातील किंमत $699, सुमारे 45 हजार रूपये), 256GB (अमेरिकी बाजारातील किंमत $849, सुमारे 54 हजार)
  • आयफोन 7 - 32GB (अमेरिकी बाजारातील किंमत $549, सुमारे 35 हजार रूपये), 128GB (अमेरिकी बाजारातील किंमत $649, सुमारे 42 हजार रूपये)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com