चांदोबा मामांचे वय 4.51 अब्ज वर्षांचे

moon
moon

'झिरकॉन्स'च्या अभ्यासाअंती संशोधकांचा निष्कर्ष

लॉस एंजेल्स : पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्राचे वयोमान नेहमीच संशोधकांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असते. काही संशोधकांच्या मते चंद्र हा पृथ्वीपेक्षा पुरातन आहे. आता नव्या संशोधनातून पूर्वीच्या अनेक समजुतींना आणि तर्कांना तडा गेला आहे. चंद्राचे वयोमान हे 4.51 अब्ज वर्षे एवढे असावे, असा दावा संशोधकांनी अभ्यासाअंती केला आहे.

'अपोलो-14' या मोहिमेच्या माध्यमातून 1971 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरून झिरकॉन्स नावाचा धातू आणण्यात आला होता. त्याचा अभ्यास करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. चंद्राचे किमान वयोमान किती असावे, हे आम्हाला अधिक अचूकरीत्या शोधता आले असल्याचे "युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'मधील भूरसायनशास्त्रज्ञ मेलेनाय बारबोनी यांनी सांगितले. अवकाशातील एखाद्या अवाढव्य वस्तूचा पृथ्वीवर आघात झाल्याने चंद्राची निर्मिती झाली असावी, असाही एक सिद्धांत संशोधकांकडून मांडला जातो.


सौरमालेची निर्मिती झाल्यानंतर तब्बल 60 दशलक्ष वर्षांनंतर चंद्राची निर्मिती झाल्याचेही यातून स्पष्ट होते. यामुळे संशोधकांना पृथ्वी आणि सौरमालेच्या निर्मिती प्रक्रियेवरदेखील नव्याने प्रकाश टाकता येईल. दरम्यान, पृथ्वीची अवकाशातील अज्ञात वस्तूशी धडक होण्यापूर्वी नेमक्‍या कोणत्या प्रक्रिया घडल्या, हे मात्र संशोधकांना समजलेले नाही. ते समजल्यानंतर त्यांना अंतराळातील अनेक घडामोडींचा संदर्भ लावता येणे शक्‍य होईल. चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारच्या खडकांचे तुकडे आढळून येतात. ते तुकडे एकत्र येऊनच चंद्र तयार झाला असावा, असाही दावा काही संशोधक करतात.

जैव इतिहास सांगणारे घड्याळ
मूळ अवस्थेतील झिरकॉन्सच्या आठ नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून, युरेनियम, ल्युटियमच्या एकत्रित चाचण्याही संशोधकांनी घेतल्या. झिरकॉन्स हा नैसर्गिक घड्याळ म्हणून ओळखला जातो. जैव इतिहास सांभाळण्याचे काम हा धातू करतो. तसेच या धातूचे जन्मस्थान शोधणेही तुलनेने अधिक सोपे असते, असे केव्हिन मॅक्केगन यांनी सांगितले. "जर्नल सायन्स ऍडव्हान्सेस'मध्ये हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com