जन्मणाऱ्या बाळावरही होतो आर्थिक ताणाचा परिणाम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

गर्भवती महिलांच्या संदर्भात रोज नवनवीन संशोधन होत आहे. त्यांच्या मानसिक आणि शाररिक आरोग्याविषयी त्या महिलेने अत्यंत जागरुक असणे आवश्‍यक आहे. अमेरिकेतील ओहियो राज्य विद्यापीठातील संशोधकांनी नुकतेच केलेल्या एका संशोधनानुसार, आर्थिकदृष्टया कमकुवत असणाऱ्या गर्भवती महिलेचे बाळदेखील शाररिकदृष्ट्या कमकुवत बाळ जन्माला येऊ शकते. 

यासाठी संशोधकांनी 138 गर्भवती महिलांचे सर्वेक्षण केले.या वेळी त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नावलीत आर्थिक ताण, उदासीनतेची लक्षणे, गर्भधारणेतील विशिष्ट त्रास, समजून आलेला ताण आणि सामान्य चिंता याबाबतच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. या गर्भव मातांचे वय 29 वर्षांच्या दरम्यान होते. तसेच त्या पाच ते 31 आठवडयांच्या गर्भवती होत्या. 
सहभागी झालेल्या गर्भवती महिलांनी बाळांना जन्म दिल्यानंतर संशोधकांनी त्यांच्या वैद्यकीय नोंदी आणि प्रश्नावली यांचा अभ्यास केला. त्यानंतर हे निष्कर्ष काढले आहेत.हे संशोधन "वुमन्स मेंटल हेल्थ' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

संशोधकांनी गर्भवती महिलांनी आर्थिक स्थितीचा ताण न घेण्याचा सल्ला दिला आहे. सामाजिक आर्थिक स्थिती वाईट असल्यास त्याचाही परिणाम गर्भावर होतो. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्ये गुंतागुंत वाढून मृत्यू होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे ओहियो राज्य विद्यापीठातील संशोधक अमंदा मिशेल यांनी म्हटले आहे.