धडक टाळण्यासाठी यानाचा मार्ग बदलला 

यूएनआय
शनिवार, 4 मार्च 2017

केप कॅनाव्हरल : मंगळाभोवती फिरणारे नासाचे मेव्हन हे यान आणि मंगळाचे दोन चंद्र यांची होणारी टक्कर टाळण्यासाठी यानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. नुकतेच या यानाच्या इंजिनाचा वेग वाढवून त्याची कक्षा नेहमीपेक्षा थोड्या फरकाने बदलण्यात आल्याची माहिती नासाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. 

मंगळाच्या अभ्यासासाठी नासाचे मेव्हन हे यान सध्या मंगळापासून सुमारे साडेनऊ हजार किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा घालत आहे. या प्रदक्षिणेदरम्यान मंगळाचा चंद्र असलेला फोबोज आणि मेव्हन समोरासमोर येऊन त्यांची येत्या सोमवारी (ता. 6) धडक होण्याची चिन्हे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यांची होणारी धडक सुमारे अडीच मिनिटाच्या फरकाने टळणार असल्याची माहिती नासाच्या कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील जेट प्रपोल्युशन लॅबोरेटरीने दिली आहे. 
मेव्हन हे अंडाकृती आकाराचे यान असून सूर्यमालेतील सर्व ग्रहांच्या चंद्राच्या तुलनेत सर्वाधिक कमी अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा घालत आहे. तर, फोबोज हा मंगळाचा चंद्र एका दिवसात तीन वेळा प्रदक्षिणा घालत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.