नासाचे स्टॉपवॉच मोजणार सेकंदाचा अब्जावा भाग 

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

वॉशिंग्टन : नासाच्या शास्त्रज्ञांनी एक असे स्टॉपवॉच बनवले आहे जे सेकंदाचा अब्जावा भागही मोजू शकते. बर्फाच्या समुद्राची अचूक उंची मोजण्यासाठी तसेच हिमनद्या, जंगल आणि पृथ्वीवरील भूभागाची मोजदाद ठेवण्यासाठीही या स्टॉपवॉचचा उपयोग होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील अभियंत्यांनी याची निर्मिती केली असून "आइस, क्‍लाउड अँड लॅंड इलेव्हेशन सॅटेलाइट-2' (आयसीईसॅट-2) या 2018 मध्ये अवकाशात झेपावणाऱ्या यानामध्ये ती वापरण्यात येणार आहे. यामध्ये उंची मोजण्यासाठी "ग्रीन लेजर बीम' ही यंत्रणाही वापरली जाणार आहे. स्टॉपवॉचमुळे अचूक उंची मोजता येणार असून, याचा शास्त्रज्ञांना मोठा फायदा होणार आहे. प्रकाश तर अतिशय वेगाने प्रवास करतो आणि प्रकाशाच्या साहाय्याने एखाद्या अंतराचे मोजमाप काढायचे असल्यास या स्टॉपवॉचची मदत होईलच; परंतु येणारे निष्कर्ष हे अचूकच असतील असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.