रोबो दाखवणार विमानतळावर वाट! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

तुम्हाला विमानतळावर पोचण्यास उशीर झाला आहे... तिथल्या गर्दीतून वाट काढत तुम्हाला फ्लाइट पकडायची आहे..अशा परिस्थितीत खूप गोंधळ उडण्याची शक्‍यता असते. तुमची ही अडचण लवकरच दूर होणार आहे!

या तणावपूर्ण परिस्थितीत रोबो तुमच्या मदतीला धावून येईल. विमानतळावर दिशामार्गदर्शन करून ईप्सित स्थळी तुम्हाला घेऊन जाणारा रोबो संशोधकांनी विकसित केला आहे. स्वीडनमधील ओरेब्रो युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक, संगणकतज्ज्ञ अकीम लिलैन्थल यांनी हा"सोशल सिच्युएशन अवेअर परसेप्शन अँड ऍक्‍शन फॉर कॉग्निटिव्ह रोबो'ऊर्फ "स्पेन्सर' विकसित केला आहे.

हा रोबो प्रवाशांना एका गेटपासून दुसऱ्या गेटपर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करेल. कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानतळावर फिरण्यासाठी लवकरच हा रोबो स्वतःचा सविस्तर मॅप विकसित करेल. त्याशिवाय आजूबाजूचा परिसर स्कॅन करण्यासाठी तो लेसर सेन्सरचा वापर करेल.

प्रा. लिलैन्थल म्हणाले,""विमानतळावर दिशादर्शन करण्याचे काम आव्हानात्मक होते. इथे मोठ्या प्रमाणात काचा असतात आणि सामान, ट्रॉली, प्रवासी यांच्या सततच्या हालचालींमुळे आजूबाजूचे वातावरण सतत बदलत राहते. ट्रॉली एखाद्या ठिकाणी किती वेळ असेल, हे आपण ठरवू शकत नाही, त्यामुळे रोबोलाही पुढचा मार्ग निवडताना जड जाऊ शकते.''ऍमस्टरडॅमधील सिफोल विमानतळावर या रोबोची चाचणी झाली. 

टॅग्स