सौरमालिकेमध्ये आहे आणखी एक ग्रह!

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सूर्यापासून नेपच्यून ग्रह असलेल्या अंतराच्या वीस पट अंतर सूर्य व या ग्रहामध्ये असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. याचबरोबर, या नवव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 10 पट असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हा नववा ग्रह "सुपर अर्थ' असू शकण्याचे सकारात्मक संकेतही मिळाले आहेत

वॉशिंग्टन - पृथ्वी असलेल्या सौरमालिकेमध्ये निश्‍चितपणे आणखी एक नववा ग्रह असल्याची माहिती नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.

सूर्यापासून नेपच्यून ग्रह असलेल्या अंतराच्या वीस पट अंतर सूर्य व या ग्रहामध्ये असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. याचबरोबर, या नवव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 10 पट असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हा नववा ग्रह "सुपर अर्थ' असू शकण्याचे सकारात्मक संकेतही मिळाले आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधील (कॅलटेक) ज्येष्ठ शास्त्रज्ञ कॉन्स्टंटिन बॅटजिन यांनी या नवव्या ग्रहाच्या अस्तित्वास पुष्टी देणारे किमान पाच पुरावे आढळल्याची माहिती दिली आहे. या नवीन संशोधनामुळे पृथ्वीसारखाच ग्रह शोधण्याच्या मोहिमेस बळ मिळाल्याचे मानले जात आहे.