'पोकिमॉन गो' लवकरच ऍपल वॉचवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

मुंबई : "पोकिमॉन गो' लवकरच ऍपल वॉचवर खेळता येईल. हा खेळ तयार करणाऱ्या निएनटिक कंपनीने या संदर्भातील माहिती ट्‌विटद्वारे दिली आहे. हा गेम भारतात कधीपासून खेळणे शक्‍य होईल, याबाबत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

"निएनटिक'ने ऍपल वॉचद्वारे "पोकिमॉन गो' खेळण्यासाठी काही विशिष्ट फीचर्स दिले आहेत. त्यामध्ये ऍपल वॉचवर टॅप करून पोकिस्टॉपनजीक पोचणे यासारख्या पर्यायांचा समावेश आहे. ऍपल वॉचसाठी गेम विकसित करण्यामागे नेमके कारण काय, हे कंपनीने उघड केलेले नाही.

"निएनटिक'ने "पोकिमॉन गो'चे भारतासाठीचे स्मार्टफोन व्हर्जन रिलायन्स जिओच्या मदतीने 15 डिसेंबरला लॉंच केले आहे. एंड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी हे व्हर्जन उपलब्ध आहे.