झूम : मोठ्या ‘प्रतीक्षा कालावधी’स कारण की...

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नवीन वाहन विक्रीचा आलेख बऱ्यापैकी वाढला. तरीही कोरोनापूर्वीच्या वर्षांची तुलना करता हा आकडा बराच कमी आहे.
Four Wheeler
Four WheelerSakal

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नवीन वाहन विक्रीचा आलेख बऱ्यापैकी वाढला. तरीही कोरोनापूर्वीच्या वर्षांची तुलना करता हा आकडा बराच कमी आहे. यातूनही उभारी घेण्याचा प्रयत्न करून टाटा, मारुती-सुझुकी, महिंद्रा, ह्युंदाई, किया, एमजी, रेनॉ, स्कोडा, फोक्सवॅगन यांसारख्या कार कंपन्यांनी नवनवीन तसेच अपग्रेड केलेल्या कार बाजारात दाखल केल्या. या कार्सची ग्राहकांनी तत्काळ आगाऊ नोंदणीही केली. प्रत्यक्षात ही वाहने बुकिंग केल्यानंतरही तत्काळ मिळणे अवघड झाले आहे. या प्रतीक्षा कालावधीच्या कारणांविषयी...

जा गतिक कोरोना साथीमुळे बहुतांश देशांनी संपूर्णत: टाळेबंदी पुकारली. परिणामी अत्यावश्यक उपकरणांचा विशेषत: सेमी कंडक्टर चिप्सचा तुटवडा जाणवू लागला. या सेमी कंडक्टर चिप्सचा कॉम्प्युटर, मोबाईल, घरगुती उपकरणे, गेम्स, इलेक्ट्रॉनिक कारमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. सेमी कंडक्टर हा असा भाग आहे जो वाहन उत्पादक कंपन्यांकडून आवश्यकतेनुसार मागवला जात होता. मुबलक प्रमाणात पुरवठा होत असल्याने वाहन उत्पादक कंपन्यांना त्यांचा साठा करण्याची गरज भासत नव्हती. परंतु, टाळेबंदीमुळे बहुतेक कार उत्पादकांना उत्पादन थांबवावे लागले, ज्यामुळे सेमी कंडक्टर चिपच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आल्या.

....म्हणून चिप्सचा तुटवडा

1) कोरोना काळात एकीकडे वाहन उद्योग ठप्प पडला असताना दुसरीकडे नोकरदार वर्गासाठी ‘वर्क फ्रॉम होम’पद्धत आल्याने संगणक व्यवसायाची मोठी भरभराट झाली. यामुळे सेमी कंडक्टर उत्पादकांनी त्यांच्या ऑर्डर्स संगणक कंपन्यांकडे वळवल्या. टाळेबंदी शिथिल झाल्यावर वाहन उद्योगाने पुन्हा वेग पकडला. हा उद्योग स्थिरस्थावर होण्याची चिन्हे असताना सेमी कंडक्टरच्या मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली.

2) कार कंपन्यांनी त्याच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. फोक्सवॅगन आणि फोर्ड कंपनीने यात आघाडी घेत उत्पादन कमी केले. सेमी कंडक्टर चिप्सच्या तुटवड्यानमुळे टोयोटा कंपनीने ४० टक्के, तर महिंद्रा आणि मारुती सुझुकीनेही ३० टक्के उत्पादन घटवले. मारुतीने गुजरातमधील प्रकल्पातील उत्पादनात तब्बल ६५ ते ७० टक्के कपात केली. तर मानेसर (हरियाणा) येथील प्रकल्पातूनही उत्पादन घटवले.

उद्भवलेल्या परिस्थितीचे नियोजन

‘‘संपूर्ण देशात कार्सना अपेक्षित मागणी आहे, परंतु सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे वाहनांचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत या समस्येतून नक्कीच बाहेर येऊ, अशी अपेक्षा आहे. वाहनांची निर्मिती आणि त्यांचा ग्राहकांपर्यंत पुरवठ्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी बहुस्तरीय पुरवठा साखळीशी अधिकाधिक समन्वय साधून उद्‌भवलेल्या परिस्थितीचे नियोजन करीत आहोत. वाहनांच्या पुरवठ्यातील आव्हाने कमी करण्यासाठी खुल्या बाजारातून चिप्स मिळवणे, मॉडेल्स तथा व्हेरिएंटचे नियोजन करणे, मानांकित केलेल्या चिप्सचा वापर करून पर्यायी डिझाईन तयार करणे, किंवा पर्यायी चिप्सचा वापर करत आहोत,’’ असे टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मागणीवर नकारात्मक परिणामाची भीती

‘‘इलेक्ट्रॉनिक उपकरणांची उपलब्धता पाहिल्यास ऑगस्टपासून वाहनांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. सप्टेंबरमध्ये नियोजित उत्पादनाच्या ४० टक्के, ऑक्टोबरमध्ये ६० टक्के, नोव्हेंबरमध्ये सुमारे ८३ ते ८४ टक्के उत्पादन आम्ही घेत आहोत. डिसेंबरमध्ये हे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांवर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. परिस्थिती सामान्य होण्यास आणखी काही वेळ लागेल. या संपूर्ण उद्योगात जागतिक पुरवठा साखळी गुंतलेली असल्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे मोठा वेटिंग पिरेड हा मागणीवर नकारात्मत परिणाम होईल,’’ अशी भीती मारुती सुझुकीच्या विक्री विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com