आता ‘शुद्धलेखन ठेवा मोबाईल’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पुणे - मराठी भाषेच्या कमी होत चाललेल्या वापराबाबत चिंता व्यक्त होत असतानाच ‘ज्यांना खरोखर शुद्ध भाषेत लिहायचे आहे, शब्दांचा वापर योग्यरीत्या करायचा आहे’ अशांसाठी ‘शुद्धलेखन ठेवा मोबाईलमध्ये’ हे नवे ॲप उपलब्ध झाले आहे. मराठी शुद्धलेखन या विषयात गेली अनेक वर्षे काम करणारे व्याकरणाचे अभ्यासक अरुण फडके यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ या फडके यांच्या पुस्तकाला वाचकांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला. या पुस्तकावर आधारित; पण नव्या माहितीसह ॲप तयार करता येईल, असा विचार समोर आला. या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार, अभ्यासकांनाच नव्हे तर नव्या पिढीलाही जोडून घेता येईल म्हणून फडके यांनी ॲप तयार केले. अशा प्रकारचे हे पहिलेच ॲप आहे. यासाठी अत्यल्प शुल्क आहे.

हमखास चुकणाऱ्या शब्दांची यादी
ॲपमध्ये तब्बल अकरा हजार मराठी शब्दांची माहिती दिली आहे. ऱ्हस्व किंवा दीर्घ, विसर्ग असणे किंवा नसणे, लेखनसाम्य असले तरी अर्थभिन्नता असणे, योग्य पर्यायी लेखन असणे अशा अनेक प्रकारच्या शब्दांची माहिती ॲपमध्ये ठळकपणे सांगण्यात आली आहे. ज्या शब्दांचे लेखन हमखास चुकते, अशा शब्दांची यादीही दिली आहे. हे शब्द लिहिताना का चुकतात, याचे स्पष्टीकरणही यात आहे, अशी माहिती फडके यांनी दिली.

सेकंदांत जाणून घ्या अचूकता
हवा असलेला शब्द शोधण्यासाठी वर्णमाला किंवा बाराखडी पाठ असणे गरजेचे नाही. ‘ॲप’मध्ये तुम्ही तुमचा शब्द लिहायला सुरवात करताच त्यानुसार खाली त्या अनुषंगाने शब्द यायला सुरवात होईल आणि काही सेकंदांतच तुमचा शब्द योग्य-अयोग्य लेखन, सामान्यरूपे, असल्यास इतर काही टीप, अर्थभेद, स्पष्टीकरण अशा आवश्‍यक त्या बाबींसह समोर येईल, असेही फडके म्हणाले.

टॅग्स