पुण्यातील नॅनो टेक्‍नॉलॉजीचा दिल्लीत गौरव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुण्यातील विकर्ष नॅनो टेक्‍नॉलॉजी अँड ऍलॉइज या संस्थेला "टेक्‍नॉलॉजी डे'निमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

नवी दिल्ली : संपूर्णत: भारतात विकसित केलेल्या नॅनो क्रिस्टलाइन रिबन्स आणि ऍमॉर्फस रिबन्स या उत्पादनांच्या यशस्वी निर्मितीसाठी पुण्यातील विकर्ष नॅनो टेक्‍नॉलॉजी अँड ऍलॉइज या संस्थेला केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड या संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

"टेक्‍नॉलॉजी डे'च्या निमित्ताने येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विकर्ष नॅनो टेक्‍नॉलॉजीचे संचालक समीर शिंदे, मिलिंद वाणी यांनी पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन हेही या वेळी उपस्थित होते. मानचिन्ह आणि पंधरा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साय-टेक

मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. ईओलिस दोर्सा नामकरण केलेल्या मंगळावरील भागात पाण्याचे साठे...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

गेल्या आठवड्यात अॅपलने नव्या मोबाईल फोनची घोषणा केली आणि आयफोन 8 ची चर्चा सुरू झाली. 'आयफोन' मुळात इतर मोबाईल फोनपेक्षा महागडा;...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

क्युपर्टिनो : अॅपल कंपनीने पहिला आयफोन सादर केल्यानंतर आता दशकभराने कंपनीने पूर्णपणे नवी रचना असलेला आयफोन बाजारात आणला आहे....

बुधवार, 13 सप्टेंबर 2017