2022 Kwid Vs Alto : किंमत अन् फीचर्समध्ये कोण आहे दमदार? वाचा डिटेल्स

Renault kwid vs Alto Comparison
Renault kwid vs Alto Comparison

Renault ने आपली सर्वात स्वस्त कार Kwid नवीन अवतारात लॉन्च केली आहे. 2022 Kwid च्या बेस व्हेरिएंटची किंमत आधीच 24,500 रुपयांनी वाढली आहे. नवीन लुकसोबतच यात अनेक नवीन फीचर्सही जोडण्यात आले आहेत. दरम्यान त्याचे 0.8-लिटर इंजिन 22.25 kmpl पर्यंत मायलेज देईल. Renault Kwid ची थेट स्पर्धा Maruti Alto 800 शी होणार आहे. आज आपण या दोन्ही कारच्या किंमती आणि फीचर्सची तुलना करणार आहोत.

Kwid vs Alto किंमत

Renault Kwid 2022 च्या बेस व्हेरिएंट RXL 0.8 ची किंमत 4.49 लाख रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंट क्लिंबर इझी-आरसाठी, तुम्हाला 5.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. तर मारुती अल्टो हॅचबॅकची किंमत 3.25 लाख ते 4.95 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. म्हणजेच किमतीच्या बाबतीत तुम्हाला अल्टो किफायतशीर वाटू शकते.

Kwid vs Alto Engine आणि Transmission

विशेष गोष्ट म्हणजे Kwid 2022 दोन इंजिन पर्यायांमध्ये येते - 0.8 लिटर पेट्रोल आणि 1.0 लिटर पेट्रोल. पहिले इंजिन 54PS पॉवर आणि 72Nm टॉर्क जनरेट करते, तर दुसरे इंजिन 68PS पॉवर आणि 91Nm टॉर्क जनरेट करते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय आहेत. अल्टोला पॉवरिंग 0.8-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे (5-स्पीड मॅन्युअलसह). हे 48PS आणि 69Nm देते. Alto ला CNG चा पर्याय देखील मिळतो ज्याने 31KM पेक्षा जास्तचे मायलेज मिळते.

Renault kwid vs Alto Comparison
स्वस्तात मस्त Renault Kwid भारतात लाँच; फक्त 'इतकी' असेल किंमत

Kwid vs Alto इंटिरियर फीचर्स

Kwid मध्ये, तुम्हाला भरपूर फीचर्स मिळतात यात 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. यात व्हिडिओ प्लेबॅक आणि व्हॉईस रेकग्निशन, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM आणि स्पोर्टी सीटसह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. दुसरीकडे, Alto ला Android Auto आणि Apple CarPlay सह कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडोसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.

Kwid vs Alto सेफ्टी फीचर्स

Renault Kwid ला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS आणि EBD, सीट बेल्ट रिमाइंडर, ओव्हरस्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि लोड लिमिटरसह डे-नाईट IRVM, रिमोट कीलेस एंट्री, इतरांसह मिळतात. त्याच वेळी, अल्टोमध्ये स्टॅंडर्ड सुरक्षा फीचर्समध्ये ड्रायव्हर साइड एअरबॅग, मागील पार्किंग सेन्सर्स आणि EBD सह ABS यांचा समावेश आहे.

Renault kwid vs Alto Comparison
Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com