घरगुती उपकरणांची काळजी घेणारे 'माय ऍसेट्‌स' 

My Assets
My Assets

एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा फोन, कम्प्युटर, प्रिंटर किंवा टीव्ही, युपीएस अशा कोणत्याही उपकरणात बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्त होईपर्यंत आपले दैनंदिन आयुष्य विस्कळित होऊन जाते. सर्व्हिस सेंटरशी किंवा स्थानिक रिपेरिंग दुकानातील व्यक्तीशी संपर्क साधून ते लवकरात लवकर दुरुस्त करून घेण्याच्या धावपळीत बराच वेळ वाया जातो. पण आता हे सगळं काही तुम्ही एका एसएमएस, व्हॉट्‌सऍप संदेश किंवा वेबसाईट, मोबाईलवरील एका क्‍लिकवर सोडवू शकता 'माय ऍसेट्‌स'द्वारे... 

घरातला टीव्ही, फ्रिज किंवा कार्यालयातील संगणक बिघडल्यावर आपले सगळे कामच ठप्प होते. सध्याच्या 'फास्ट लाईफ'मध्ये असे कोणतेही उपकरण बिघडल्यावर ते दुरुस्त होईपर्यंत आपण 'अस्वस्थ' होतो. सर्व्हिस सेंटरचा प्रतिनिधी किंवा घर, कार्यालयाजवळच्या रिपेअरिंग दुकानातील कर्मचाऱ्याशी बोलणे, त्याची वाट पाहात बसणे आणि हे सर्व होईपर्यंत कामे खोळंबून तर राहतातच आणि वेळसुद्धा वाया जातो. 

प्रत्येक घरातली ही अडचण ओळखून विश्‍वास महाजन आणि उदय कोठारी या दोघा टेक्‍नोप्रेन्यूअर्सने 'माय ऍसेट्‌स' ही सेवा सुरू केली आहे. संकेतस्थळ किंवा मोबाईल ऍपवरील एका क्‍लिकवर किंवा एसएमएस, व्हॉट्‌सऍपवरील एका संदेशाद्वारे पाहिजे ती दुरुस्तीची सेवा तुम्हाला घरपोच देण्याची सुविधा 'माय ऍसेट्‌स'द्वारे मिळते. सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधणे, त्यांच्याशी फॉलोअप घेणे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत मागावर राहणे ही सर्व प्रक्रिया 'माय ऍसेट्‌स' करते आणि तेवढा वेळ तुम्ही इतर कामे किंवा चक्क आरामही करू शकता. सर्व उपकरणांची खरेदीची पावती, सेवा वॉरंटी, एक्‍सपायरी डेट ही सर्व माहिती 'क्‍लाउड'वर साठवून ठेवून त्या माहितीच्या आधारे व्यवस्थापन करणे ही 'माय ऍसेट्‌स'ची मूलभूत कार्यप्रणाली आहे. थोडक्‍यात सांगायचे तर 'माय ऍसेट्‌स' हा उपकरणांचे 'आधारकार्ड' आहे. 

महाजन म्हणाले, ''कोणत्याही व्यक्तीने माय ऍसेट्‌सशी संपर्क साधल्यावर आमच्या तज्ज्ञ मंडळींमार्फत चांगला सेवा पुरवठादार शोधणे, त्याला संपर्क साधणे आणि तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपकरणाचा मॉडेल क्रमांक, सिरिअल क्रमांक, वेगवेगळ्या लोकांशी गरज पडेल तेव्हा बोलणे हेसुद्धा माय ऍसेट्‌समार्फत केले जाते.'' 

''उपकरणाचा फोटो, त्यावरील बारकोड किंवा क्‍युआर कोड ओळखण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक उपकरणाचा फोटो किंवा कोड, खरेदी पावती, वारंटी कार्डचे फोटो व्हॉट्‌सऍप करणे किंवा अपलोड करण्याचे प्राथमिक कष्ट संबंधित व्यक्तीला घ्यावे लागतात. सुमारे 400 उत्पादक कंपन्यांच्या 1300 उपकरणांची माहिती (डेटाबेस) संकलित करण्यात आली आहे. युझरने अपलोड केलेला फोटो आणि डेटाबेसमधील माहिती तपासली जाते आणि त्याप्रमाणे सेवा दिली जाते. छोट्या उपकरणांनी सुरवात करत टप्प्याटप्प्यात सर्व उपकरणांची माहिती पाठविणे किंवा सर्व माहिती एकाचवेळी पाठवण्याची सोय माय ऍसेट्‌समध्ये आहे. तसेच, ही माहिती गोळा करण्यासाठी माय ऍसेट्‌सचा प्रतिनिधी घरी भेटही देऊ शकतो,'' असे महाजन यांनी सांगितले. 

  • ऍप इन्स्टॉल्सची संख्या - 10 ते 50 हजार 
  • अँड्रॉईड 4.0 किंवा पुढचे व्हर्जन आवश्‍यक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com