स्मार्ट "टॅब्लेटवॉच'मुळे बोला "मनगटा'वरून 

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

स्मार्टफोन आणि त्यातील नवनवीन व्हर्जन्सनी सर्वांनाच वेड लावले आहे. मनगटावरील घड्याळाप्रमाणे वापरता येणाऱ्या स्मार्टफोनची कल्पना कशी वाटते? म्हणजे तुम्हाला कॉल घ्यायचा असेल, गाणी ऐकायची असतील किंवा छायाचित्र काढायचे असल्यास खिशातील स्मार्टफोन काढायची गरज नाही! अमेरिकेतील "रफस लॅब्स' या कंपनीने संगणक आणि फोनचे मिश्रण असलेला घड्याळाप्रमाणे मनगटावर घालता येणारा टॅब्लेट बनवला आहे. हा टॅब्लेट एक प्रकारचे स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचचा स्क्रीन 3.2 इंचाचा असून, त्याला "टीआय कॉर्टेक्‍स ए' या प्रोसेसरमधून ऊर्जा पुरविली आहे.

स्मार्टफोन आणि त्यातील नवनवीन व्हर्जन्सनी सर्वांनाच वेड लावले आहे. मनगटावरील घड्याळाप्रमाणे वापरता येणाऱ्या स्मार्टफोनची कल्पना कशी वाटते? म्हणजे तुम्हाला कॉल घ्यायचा असेल, गाणी ऐकायची असतील किंवा छायाचित्र काढायचे असल्यास खिशातील स्मार्टफोन काढायची गरज नाही! अमेरिकेतील "रफस लॅब्स' या कंपनीने संगणक आणि फोनचे मिश्रण असलेला घड्याळाप्रमाणे मनगटावर घालता येणारा टॅब्लेट बनवला आहे. हा टॅब्लेट एक प्रकारचे स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचचा स्क्रीन 3.2 इंचाचा असून, त्याला "टीआय कॉर्टेक्‍स ए' या प्रोसेसरमधून ऊर्जा पुरविली आहे. छायाचित्र किंवा व्हिडिओ घेण्यासाठी स्मार्टवॉचच्या पुढच्या बाजूला कॅमेऱ्याचीही सोय आहे. स्मार्टफोनप्रमाणेच जीपीएस, वायफाय, ब्लू टूथ, ड्युएल मायक्रोफोन, इन बिल्ट स्पीकर्स ही या स्मार्टवॉचची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, स्मार्टवॉचच्या साह्याने कॉल्सचे उत्तरही देता येते. "अँड्रॉईड किटकॅट' असलेला या स्मार्ट टॅब्लेट वॉचमध्ये 16,32 किंवा 64 जीबी इंटर्नल मेमरी असून, मल्टी लॅंग्वेज सपोर्ट हेही या स्मार्टवॉचचे फिचर आहे. हे नवे 
स्मार्टवॉच अनेकांना, विशेषतः मनगटावरील उपकरणामध्ये स्मार्टफोनसारख्या सोयी हव्या असणाऱ्यांना आवडेल. हे स्मार्टवॉच स्मार्टफोनसह वॉलेट, फिटनेस ट्रॅकरची गरज भागवेल. हे स्मार्टवॉच 249 डॉलरपासून उपलब्ध आहे.