वेगावर ट्रॅक... स्पीडोट्रॅक!

किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

व्हीजेटीआयच्या टेक्‍नोवान्झामध्ये जन्मले नवे ऍप
त्यांनी चर्चेतून ट्रॅकिंग ऍप्लिकेशन असा आपल्या कामाचा फोकस निश्‍चित केला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी 10 तासांत ऍप्लिकेशनचे प्रोटोटाईप मॉडेल तयार केले.

मुंबई : मुंबईचे घाईगर्दीचे रस्ते असोत किंवा हायवेला वाऱ्याशी होणारी स्पर्धा, बाईक किंवा कारच्या वेगाची माहिती घेणे, त्यांचे ठिकाण शोधणे व अपघाताची माहिती नातेवाइकांना मिळणे स्पीडोट्रॅक या ऍप्लिकेशनमुळे शक्‍य होणार आहे.
मुंबईतील सिद्धेश गावडे व कुलदीप मौर्य या तरुणांनी अवघ्या 10 तासांत स्पीडोट्रॅक तयार केले. त्यांच्या "टीम फायरब्लेड'ने या प्रकल्पावर काम करण्याचे ठरवल्यानंतर त्यांचे चार ते पाच तास संकल्पना निश्‍चित करण्यातच गेले. मग त्यांनी चर्चेतून ट्रॅकिंग ऍप्लिकेशन असा आपल्या कामाचा फोकस निश्‍चित केला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी 10 तासांत ऍप्लिकेशनचे प्रोटोटाईप मॉडेल तयार केले.

व्हीजेटीआय टेक्‍नोवान्झा फेस्टिव्हलमध्ये एम इंडिकेटर ऍप्लिकेशनच्या ट्रान्स्पोर्ट हॅकॅथॉन स्पर्धेंतर्गत हे यश गावडे व कुलदीप यांनी मिळवले. या स्पर्धेत 400 संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 58 संघ स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. इतर स्पर्धकांनी ओला, उबेर यांचा कुरिअरचा वापर करणे, काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीसाठी ऍप्लिकेशन, इच्छित स्थळी पोहचण्याआधीच ऍप्लिकेशनवर ऍलर्ट अशा संकल्पना मांडल्या होत्या.

या ऍप्लिकेशनद्वारे वाहनाचे रस्त्यावरचे नेमके ठिकाण कोणते याची माहिती मिळवण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर होईल. वाहनाच्या वेगाची माहितीही हे ऍप्लिकेशन देईल. वाहनाचा वेग वाढल्यानंतरही त्याबाबतची माहिती हे ऍप देईल. मोबाईल सेन्सरमुळे वाहनाला अपघात झाल्यानंतर त्याची आणि गाडीचा वेग कमी झाल्यास त्याचीही माहिती हे ऍप देईल.

अनेकदा एकाच कंपनीच्या गाड्या, ट्रक एकाच मार्गावर धावतात. लॉंग ड्राईव्हला एकत्रित निघालेले बाईकस्वारही मोठ्या रस्त्यांवर मागे-पुढे असतात. अशा वेळी आपल्या सहकाऱ्याची तंतोतंत माहिती मिळवण्यासाठी या ऍपचा उपयोग होऊ शकेल, असे सिद्धेशने सांगितले. एखादे वाहन किती वेगाने धावत आहे, ते त्याच्या ताफ्यातील वाहनांपेक्षा किती मागे आहे, याबाबतचा तपशीलही ऍपद्वारे मिळेल, असाही विश्वास त्याने व्यक्त केला.

सरकारलाही उपयुक्त
सरकारी यंत्रणेला वाहनांचा डेटाबेस देण्यासाठीही या ऍप्लिकेशनचा वापर महत्त्वपूर्ण ठरू शकतो. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, सिग्नलचे अडथळे, टोल नाके यांमुळे वाहनांच्या वेगावर होणारा परिणाम यांचीही माहिती हे ऍप देईल. वाहनांची संख्या, ठरावीक रस्त्यांवरील नियमित ट्रॅफिक यांचीही माहिती ते देईल.

साय-टेक

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये तब्बल 6 जीबी 'रॅम' असेल, असे समजते आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची चाचणी घेणाऱया Geekbench या...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017

वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : भारतामध्ये आता जवळपास प्रत्येक हातात स्मार्टफोन असला, तरीही त्यापैकी बहुतांश स्मार्टफोनवर वापरण्यासाठी अद्याप...

मंगळवार, 1 ऑगस्ट 2017