OnePlus वापरताय? आवर्जून लक्ष द्या...

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

अँड्रॉईडचे सध्या नोगट व्हर्जन वापरात आहे. यानंतरच्या व्हर्जनचे नाव ओ आहे. झेड यांच्या घोषणेचा अर्थ असा आहे, की ओ नंतर येणाऱया व्हर्जन्सवर वनप्लस3 आणि वनप्लस3टी हे फोन पूर्ण क्षमतेने वापरता येणार नाहीत.

वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर कोणतेही नवीन व्हर्जन अपडेट होणार नाही. 'वनप्लस'चे उत्पादन प्रमुख ऑलिव्हर झेड यांनी ही कंपनीच्या वेबसाईटवरील फोरम पेजवर तशी घोषणा केली आहे. 

अँड्रॉईडचे सध्या नोगट व्हर्जन वापरात आहे. यानंतरच्या व्हर्जनचे नाव ओ आहे. झेड यांच्या घोषणेचा अर्थ असा आहे, की ओ नंतर येणाऱया व्हर्जन्सवर वनप्लस3 आणि वनप्लस3टी हे फोन पूर्ण क्षमतेने वापरता येणार नाहीत.

वनप्लस3 आणि वनप्लस3टी या हँडसेटसाठी अँड्रॉईड ओ हे शेवटचे व्हर्जन अपडेट केले जाईल. त्यानंतर कोणतेही व्हर्जन या मोबाईलवर येणार नाही. भविष्यात पुरेसा काळ आम्ही या हँडसेटसाठी सिक्युरिटी अपडेटस् देत राहू, असे झेड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे. या कंपनीच्या मोबाईलमध्ये ओपन बीटा अपडेट सॉफ्टवेअर आहे. यापुढील काळात वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलएेवजी वनप्लस5 हँडसेटमध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. या सॉफ्टवेअरमार्फत कंपनी अँड्रॉईडमधील सुविधा वनप्लस हँडसेटमध्ये पुरवत आहे. 

गूगलची अँड्रॉईड ओ आवृत्ती सध्या तयार होते आहे. येत्या दहा-पंधरा दिवसात अँड्रॉईड ओ लाँच होईल, अशी अपेक्षा आहे. भारतात वनप्लस3 गेल्यावर्षीच्या जूनमध्ये; तर वनप्लस3टी डिसेंबर 2016 मध्ये लाँच झाला आहे.

Web Title: Technology news in Marathi oneplus 3 oneplus 3t no updates after android o