झोपेत टीव्ही नियंत्रित करणारा बॅंड

tv controller band in hand sleeping virgin media
tv controller band in hand sleeping virgin media

टीव्हीवर आवडता कार्यक्रम पाहताना झोप लागण्याचा अनुभव नवीन नाही. मात्र मॅन्चेस्टरमधील दोन विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मनगटात घालता येणाऱ्या थ्रीडी बॅंडमुळे ही समस्या सुटू शकते.

रेयान ऑलिव्हर आणि जोनाथन किंग्जले यांनी व्हर्जिन मीडियाच्या सहकार्याने"किप्स्ट आर' नावाचा हा बॅंड बनवला आहे. तो पल्स ओझिमीटरच्या साहाय्याने संबंधित व्यक्ती कधी झोपी जाईल, तसेच कधी जागी होईल हे ओळखतो. रक्तातील ऑक्‍सिजनची पातळी मोजण्यासाठी पल्स ओझिमीटरचा उपयोग होतो. रक्ताच्या प्रवाहातील बदलाच्या मदतीने पल्स ओझिमीटर त्या व्यक्तीच्या झोपेचा अंदाज बांधू शकते.

हा बॅंड टीव्हीवर सुरू असलेल्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ठेवतो. या रेकॉर्डिंगमध्ये कुठल्या ही अडथळ्याशिवाय कुटुंबातील इतर सदस्य टीव्ही पाहू शकतात. रेकॉर्ड केलेला कार्यक्रम जागे झाल्यानंतर पुन्हा पाहता येतो. झोपलेली व्यक्ती मध्येच जागी झाल्यास टीव्हीवरील
कार्यक्रम पुन्हा सुरू होतो. ऑलिव्हरने सांगितले,""या बॅंडची यशस्वी निर्मिती केल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. या प्रकल्पातून खूप शिकायला मिळाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com