ट्विटरचे नवे 'बुकमार्क' फिचर 

Twitter-Save-For-Later
Twitter-Save-For-Later

ट्विटरने 'save for later' या नव्या बुकमार्किंग फिचरची चाचणी सुरु केली असून, याबाबत ऑक्टोबर महिन्यातच घोषणा करण्यात आली होती. सध्या 330 दशलक्ष ऍक्टिव्ह युझर्सना ही सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती ट्विटरने दिली आहे. 

या नव्या फिचरमुळे आपल्या सोयीप्रमाणे खासगी वापरासाठी युजर्सला ट्विट 'फ्लॅग' करता येणे शक्य होणार आहे.  
 
ट्विटरच्या स्टाफ प्रॉडक्ट डिझायनर टीना कोयामा यांनी गुरुवारी ट्विट करत या फिचरची माहिती दिली असून, युझर्सला नेव्हिगेशनसाठी आणि  इतर फिचर्सच्या नावाला साजेसे म्हणून हे नवे बुकमार्क नावाचे फिचर ट्विटरने आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

'बुकमार्क फिचर'

  • या फिचरमध्ये सेव्ह केलेल्या ट्विट्सची वेगळी यादी तयार होणार आहे.
  • यामुळे आपल्याला हवे असेल तेव्हा ही बुकर्माक केलेली ट्विट्स बघता येणे शक्य होणार आहे.
  • ट्विटरचे ऍप अपडेट केल्यावर, स्मार्टफोनवर ट्विटच्या खाली उजव्या बाजूला बुकमार्कचा ऑप्शन दिसणार आहे. 
  • तर डेस्कटॉपवर वरच्या बालूला ड्रॉपडाऊनमध्ये हे फिचर दिसेल.
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com