व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनसाठी 'रिस्ट्रिक्टेड ग्रुप' फिचर 

वृत्तसंस्था
सोमवार, 4 डिसेंबर 2017

तुम्ही व्हॉट्सऍप ग्रुपचे ऍडमिन आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सऍप नवे फिचर घेऊन येत आहे ज्यामुळे ग्रुप ऍडमिनला आणखी काही अधिकार मिळणार आहेत.

WABetaInfo'ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सऍप ग्रुपमधील ऍडमिनला आता जास्त अधिकार मिळणार आहे. ग्रुप सब्जेक्ट, आयकॉन आणि डिस्क्रिप्शन बदलणे याचबरोबर आता कोणत्याही मेंमर्सचे मेसेजेस रिस्ट्रिक्ट करण्याचा अधिकार मिळणार आहे. 

यामध्ये ग्रुपमधल्या इतर मेंबर्सनी कोणते फोटो, व्हिडिओ, जीआयएफ इमेज, पोस्ट, व्हॉईस मेसेजेस शेअर करायचे याबद्दलचा निर्णय आता ऍडमिन घेऊ शकतो. शिवाय फक्त ग्रुप ऍडमिनला रिस्ट्रिक्टेड ग्रुपचे सेटिंग ऍक्टिव्हेट करता येणार आहे. 

ज्या मेंबर्सला ऍडमिनने रिस्ट्रिक्ट केले असेल त्यांना फक्त इतरांच्या पोस्ट वाचता येणार आहेत. मात्र कोणत्याही पोस्ट शेअर करता येणार नाही.  

Web Title: WhatsApp group admins to get more power, ability to restrict messages from other members