रेडमी नोट 5 चा आज 24 तासांचा सेल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

रेडमी नोट 5 ची विक्री केवळ Mi.com या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर केली जाईल.

मुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. 

रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज व 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनचा समावेश आहे. ज्याची किंमत अनुक्रमे 9 हजार 999 रुपये आणि 10 हजार 999 रुपये आहे. रेडमी नोट 5 ची विक्री केवळ Mi.com या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर केली जाईल. ट्विटरवरुन कंपनीने याबाबत माहिती दिली. रात्री 12 वाजल्यापासून शाओमी रेडमी नोट 5 पहिल्यांदाच विक्रीसाठी 24 तासांसाठी उपलब्ध होईल. 5.99 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि अँड्रॉईड नॉगट सिस्टम या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. याशिवाय 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही विक्री mi.com वर केली जाईल, असे कंपनीने म्हटले होते. त्यानुसार या फोनची विक्री सुरु आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Xiaomi Redmi Note 5 24 Hours Sell For First Time On Website