पास्ताप्रेमींसाठी खूशखबर!

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

वॉशिंग्टन : पास्ता खाल्यामुळे वजन वाढते, असा सर्वांचाच समज आहे; मात्र एका नव्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की पास्ता खाणाऱ्यांचे वजन वाढत नाही, तर ते अल्प प्रमाणात का होईना पण कमीच झालेले दिसून येते. 

टोरॉंटो विद्यापीठ आणि सेंट मायकल हॉस्पिटलमधील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, त्यात पास्ता खाणाऱ्यांचे वजन वाढत नाही, असा दावा करण्यात आला आहे. तीस वेगवेगळ्या अभ्यास अहवालांचा एकत्रितपणे अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला असल्याचे सांगण्यात आले. 

विविध पदार्थांमधील कर्बोदकांचा रक्तातील साखरेच्या प्रमाणावर किती परिणाम होतो, याचा संशोधकांनी शोध घेतला. सर्वसाधारणपणे, आठवडाभरात तीन वेळा पास्ता खाणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. बारा आठवड्यानंतर या व्यक्तींचे वजन मोजले असता ते वाढलेले आढळून आले नाही. उलट ते अल्प प्रमाणात कमी झालेलेच दिसून आले. त्यामुळे वजन वाढण्याच्या चिंतेपोटी पास्ता खाण्याचे टाळणारांसाठी ही बातमी आनंददायी ठरू शकते.

Web Title: You can lose weight by eating Pasta, says a research

टॅग्स